मराठी बातम्या /बातम्या /पुणे /मित्र घरी आला अन् त्याला सांगितले पत्नीला मारुन टाकलंय, घराजवळ पुरला मृतदेह

मित्र घरी आला अन् त्याला सांगितले पत्नीला मारुन टाकलंय, घराजवळ पुरला मृतदेह

आपल्या हातून पत्नीचा खून झाल्याची माहिती कुणाला कळू नये म्हणून त्याने घराजवळ मोठा खड्डा खोदला.

आपल्या हातून पत्नीचा खून झाल्याची माहिती कुणाला कळू नये म्हणून त्याने घराजवळ मोठा खड्डा खोदला.

आपल्या हातून पत्नीचा खून झाल्याची माहिती कुणाला कळू नये म्हणून त्याने घराजवळ मोठा खड्डा खोदला.

सुमित सोनवणे, प्रतिनिधी

दौंड, 10 ऑक्टोबर :  पती आणि पत्नीमध्ये वाद आणि भांडणं होणं ही नवीन गोष्ट नाही. पण पैशाच्या वादावरून राग अनावर झाल्यामुळे एका पतीने आपल्या पत्नीचा खून (wife murder) केला. पत्नीचा खून करुन तो एवढ्यावर थांबला नाहीतर त्याने घराशेजारीच पत्नीचा मृतदेह पुरून ठेवला होता. अखेर हे प्रकरण समोर आल्यानंतर पतीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे (pune) जिल्ह्यातील दौंड (dound) तालुक्यातील वखारी गावच्या हद्दीत पिरबाबा दर्गाजवळ ही घटना घडली. माया वाघमारे असं मृत महिलेचं नाव आहे.   रमेश सुंदर वाघमारे (वय 30) याने त्याची बायको माया हे दोघे परिसरात राहत होते. पैशाच्या देवाणघेवाणीवरून नवरा बायकोचा वाद झाला होता.

आधुनिक महिलांना नको असतं मूल, पाश्चिमात्यांचा प्रभाव चिंताजनक

या वादामुळे संतापलेल्या रमेश याने मायाला बेदम मारहाण केली. लाथाबुक्याने मारहाण केल्यामुळे माया जखमी झाली होती. मुक्का मार लागल्यामुळे वेदनेनं विव्हळत मायाने जीव सोडला.  बायकोचा मृत्यू झाल्यामुळे रमेश हादरुन गेला. आपल्या हातून पत्नीचा खून झाल्याची माहिती कुणाला कळू नये म्हणून त्याने घराजवळ मोठा खड्डा खोदला आणि पत्नीचा मृतदेह पुरुन टाकला.

यादरम्यान कोळसा व्यापारी नितीन सुरेश ठोंबरे हे कामानिमित्त वाखारी येथे रमेश वाघमारेकडे आले असताना तुझी बायको कुठं आहे, असे विचारले. यावेळी तिला मी मारून टाकल्याचे, तो म्हणाला. सुरुवातीला तो गंमत करत असल्याचं वाटलं. पण, त्याने आपण तिला खरंच मारुन टाकलं असं सांगितलं.

लस घेणाऱ्यांना मोफत तेल आणि अनेक गिफ्ट्स, या ठिकाणी मिळतेय ऑफर; पाहा PHOTOs

त्यानंतर नितीन ठोंबरे यांनी यवत पोलिसांत फिर्याद दिली. यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर रमेश वाघमारेची चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. तसंच घराजवळच तिचा मृतदेह पुरला असल्याचं सांगितलं. पोलिसांनी रमेशला अटक केली  असून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहे.

First published: