Home /News /pune /

पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या, 7 वर्षांची मुलगी झाली पोरकी

पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या, 7 वर्षांची मुलगी झाली पोरकी

आर्थिक ताण तणावातून पती आणि पत्नीमध्ये वादही होत होता. या नैराश्यातून त्याने पत्नीचा गळादाबून खून केला.

    पुणे 14 जानेवारी : दररोजच्या जगण्यातला संघर्ष, नोकरीतला ताण तणाव, पैशांची चणचण आणि घरं चालविण्याचा दबाव आल्याने पतीने पत्नीचा खून करून स्वत: आत्महत्या केलीय. या दाम्पत्याला एक सात वर्षांची मुलगी असून ती आता पोरकी झालीय. या घटनेनं भोसरीत खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. ताण तणावाच्या सध्याच्या जगात हा ताण सहन करण्याची ताकद माणसांमध्ये कमी होतेय. त्यामुळे अशा प्रकारे टोकाचं पाऊल उचलण्यास लोक प्रवृत्त होत असल्याचं मत मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. पुण्यातल्या भोसरीमध्ये निलेश आणि प्रियंका देशमुख हे दाम्पत्य राहात होतं. त्यांना सात वर्षांची मुलगी आहे. निलेश हे नोकरी करत आपलं घर चालवत होते. पण घर चालविताना त्यांची मोठी आर्थिक ओढाताण होत असे. मुलींचा शिक्षणाचा खर्च आणि घर चालवताना होणारी कुचंबना यामुळे निलेश हे कायम तणावात असायचे. यातून त्यांना निराशाही आली होती. या परिस्थितीमुळे त्यांच्यात आणि त्यांच्या पत्नीमध्ये वादही होत होता. या नैराश्यातून त्यांनी पत्नीचा गळादाबून खून केला आणि नंतर आत्महत्या केली. घरातले आई-वडिल दोघेही गेल्याने मुलगी प्रचंड हादरून गेली असून तिला धक्का बसलाय. आधी गंगारामला लटकवलं जातं, मग दिली जाते फाशी, काय आहे रहस्य? घटनेची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि त्यांनी चौकशीला सुरुवात केलीय. आर्थिक ताण-तणावांशिवाय अन्य काही कारण आहे काय याचा शोध पोलीस घेत आहेत. निर्भयाच्या मारेकऱ्यांना फाशी देण्यासाठी मागवली केळी, काय आहे कारण? या प्रकरणी दाम्पत्याच्या कुटुंबीयांकडे आणि मित्रपरिवाराकडेही पोलीस चौकशी करत आहेत. आर्थिक कारणांशिवाय इतर काही कारणं आहेत का याचीही माहिती पोलीस घेत आहेत.  सर्व शक्यतांचा विचार करून चौकशी करणार असल्याचं भोसरी पोलिसांनी सांगितलं.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Pune murder, Pune police

    पुढील बातम्या