सात जन्माचं नात शुल्लक वादातून संपलं, पतीने कुऱ्हाडीने घाव घालून पत्नीची केली हत्या

सात जन्माचं नात शुल्लक वादातून संपलं, पतीने कुऱ्हाडीने घाव घालून पत्नीची केली हत्या

पतीने शुल्लक कारणातून वाद झाल्यामुळे पत्नीची हत्या केली आहे. शरीरावर कुऱ्हाडीने वार करत त्याने पत्नीला संपवलं आहे.

  • Share this:

पुणे, 01 एप्रिल : पुण्याच्या वानवडीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीने शुल्लक कारणातून वाद झाल्यामुळे पत्नीची हत्या केली आहे. शरीरावर कुऱ्हाडीने वार करत त्याने पत्नीला संपवलं आहे. या गंभीर प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

संगीता श्रीकांत चव्हाण वय 26 असं मृत महिलेचं नाव आहे. तर आरोपी श्रीकांत कलम चव्हाण या सध्या फरार आहे. खरंतर हे चव्हाण जोडपं मुळचं कर्नाटकचे आहेत. बिगारी काम करण्यासाठी ते दोघे 3 दिवसांपूर्वीच महंमद वाडीमध्ये आले होते.

रात्री दोघा नवरा-बायकोमध्ये वाद झाला आणि त्यातून राग अनावर झाल्यामुळे श्रीकांतने पत्नीची हत्या केली. बिगारकाम करण्यासाठी लागणाऱ्या कुऱ्हाडीनेच पत्नीवर घाव करत तिची हत्या केली. कुऱ्हाडीमुळे संगीता यांच्या शरीरावर गंभीर इजा झाल्या होत्या. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

तर हत्या केल्यानंतर श्रीकांत फरार झाला आहे. या घटनेची माहिती शेजाऱ्यांना मिळताच त्यांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी चव्हाण यांच्या राहत्या घरातून संगीताचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस आता श्रीकांतचा कसून तपास करत आहेत.

VIDEO: शेतकऱ्याच्या लेकीचं वऱ्हाड, इंजिनिअर प्रियांकाचा थाटच न्यारा

First published: April 1, 2019, 9:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading