पिंपरीत घटस्फोटासाठी पतीने पत्नीच्या शरीरात सलाईनमधून सोडले HIVचे विषाणू

पिंपरीत घटस्फोटासाठी पतीने पत्नीच्या शरीरात सलाईनमधून सोडले HIVचे विषाणू

पिंपरीच्या थेरगावमध्ये पत्नीकडून घटस्फोट मिळवण्यासाठी चक्क पत्नीच्या शरीरात HIV चे विषाणू सोडल्याचा प्रकार घडला आहे.

  • Share this:

गोविंद वाकडे, प्रतिनिधी

पिंपरी थेरगाव, 30 नोव्हेंबर : पिंपरीच्या थेरगावमध्ये पत्नीकडून घटस्फोट मिळवण्यासाठी चक्क पत्नीच्या शरीरात HIV चे विषाणू सोडल्याचा प्रकार घडला आहे. यासंदर्भात 27 वर्षाच्या विवाहितेने पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. पिंपळे सौदागर परिसरातील ही घटना आहे.

आरोपी पती वारंवार पत्नीकडे माहेरहून व्यवसायासाठी पैसे आण अशी मागणी करत होता. त्यासाठी त्याने पत्नीचा मानसिक आणि शाररीक छळही केला. आरोपी पतीने आधीच पत्नीच्य़ा माहेरच्यांकडून पैसे घेतले होते. त्यामुळे आणखी पैसे आणणं पत्नीला शक्य नव्हत. यासगळ्यामुळे पतीने पत्नीचा छळवाद करायला सुरूवात केली.

या सगळ्या छळामुळे पीडित पत्नी आजारी होती. त्यात पतीला तिच्याकडून घटस्फोट हवा होता. पत्नीच्या आजारपणाचा फायदा घेत पतीने तिच्या सलाईनमधून HIV चे विषाणू सोडेल. त्यामुळे पत्नीला HIV ची लागण झाली.

ही सगळी बाब लक्षात येताच पीडित पत्नीने यासंदर्भात पोलिसांत पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रारीनुसार आरोपीला ताब्यात घेतलं असून या प्रकराणात कसून तपास करत आहे.

आरोपीने HIV चे विषाणू कुठूण आणले. यात त्याला कोणी मदत केली का? तर यात त्याला कोणी मदत केली का या सगळ्याचा आता पोलीस तपास करत आहेत.

तर पीडित एचआयव्ही महिला सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान पती-पत्नीसारख्या सुंदर नात्याचा असा खून झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.


काचेच्या प्लेट उचलून ठेवताना पडल्या अंगावर, श्वास रोखायला लावणार

CCTV

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 30, 2018 12:49 PM IST

ताज्या बातम्या