मित्र म्हणाले, तुझ्या बायकोचे दुसरीकडे झेंगाट.. तरुणाने उचललं हे पाऊल

मित्र म्हणाले, तुझ्या बायकोचे दुसरीकडे झेंगाट.. तरुणाने उचललं हे पाऊल

ज्ञानेश्वरला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी त्याच्या बायकोच्या गावातील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  • Share this:

पुणे,21 सप्टेंबर:आपल्या बायकोचं दुसरीकडं झेंगाट सुरू असल्याची माहिती मिळताच पुण्यात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्ञानेश्वर दत्तू कांबळे (रा.मोशी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ज्ञानेश्वरला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी त्याच्या बायकोच्या गावातील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?

आरोपी अजय नंदकुमाप घाडगे आणि बालाजी अशोक येडके (दोन्ही रा. देवळाई, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) या दोघांनी ज्ञानेश्वरच्या सासरवाडीची आहेत. ज्ञानेश्वर आणि त्यांची काही महिन्यांपूर्वी मैत्री झाली होती. एके दिवशी दोघांनी ज्ञानेश्वरला खूप दारू पाजली. एवढेच नाही तर 'तुझ्या बायकोचे दुसरीकडे झेंगाट सुरू आहे.' असे सांगितले. यावरून ज्ञानेश्वरचा प्रचंड संताप झाला. त्यानंतर आरोपींनी ज्ञानेश्वरला फोन करून त्याच्या पत्नीविषयी काही बाही सांगितले. ज्ञानेश्वरही पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला.अखेर मानसिक त्रास सहन न झाल्याने ज्ञानेश्वरने मोशी येथील राहत्या घरात 29 जुलै रोजी लोखंडी अॅंगलला पत्नीच्याच साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी सुरूवातीला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती. मात्र, ज्ञानेश्वरच्या आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस पुढील तपास करत आहे.

पुण्यात सिलिंडरचा स्फोट; स्फोटाची भीषणता दाखवणारा VIDEO

Published by: Sandip Parolekar
First published: September 21, 2019, 8:36 PM IST
Tags:

ताज्या बातम्या