Home /News /pune /

पुणे: भांडणात पतीने घेतला पत्नीच्या मनगटाचा चावा, कोर्टाने थेट दिली घटस्फोटाला मंजूरी

पुणे: भांडणात पतीने घेतला पत्नीच्या मनगटाचा चावा, कोर्टाने थेट दिली घटस्फोटाला मंजूरी

2014मध्ये या पती-पत्नीचा विवाह झाला. त्यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांना 4 मुलंही आहेत.

    पुणे, 21 फेब्रुवारी : पुण्यामध्ये पत्नी पत्नीचा वाद असा काही टोकाला गेला की कोर्टाला पत्नीच्या बाजूने घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला. पत्नीच्या हाताच्या मनगटाचा चावा घेणं पतीला चांगलंच महागात पडलं आहे. गुंडगिरीच्या आहेरी गेलेल्या पतीवर अनेक गुन्हे दाखल होते. त्याच्या त्रासाला कंटाळून पत्नीने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. अखेर हा अर्ज फॅमिली कोर्टातील न्यायाधीश एन. आर. नाईकवडे यांच्या कोर्टाने मंजूर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2014मध्ये या पती-पत्नीचा विवाह झाला. त्यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांना 4 मुलंही आहेत. सगळं व्यवस्थित सुरू असताना पती गुंडगिरीच्या नादी लागला. त्यामुळे तो सारखा जेलमध्ये असायचा. पत्नीवर संशय घेऊन तिला मारहाण करून रोज त्रास द्यायचा. सप्टेंबर 2017 मध्ये अशीच मारहाण सुरू असताना पतीने पत्नीच्या उजव्या हाताच्या मनगटाचा चावा घेतला. इतका जोरात जावा घेतला की हाताची कातडी चक्क लोंबत होती. त्यानंतरही पत्नीने मुलांसाठी सगळं सहन केलं. पण पाणी डोक्याच्या वर गेल्यानंतर पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पण पोलिसांनी घटनेकडे दुर्लक्ष केलं. इतर बातम्या - महाशिवरात्रीच्या यात्रेला नराधमाने मुलीची काढली छेड, नागरिकांनी दिला बेदम चोप यानंतर एका संस्थेच्या मदतीने पत्नीने कोर्टामध्ये घटस्फोटाची याचिका दाखल केली. पतीने अनेक कारणं देत कोर्टात येण्यासाठी नकार दिला. त्यानंतर कोर्टाने पतीविषयी माहिती काढली असता त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं. त्यानंतर कोर्टाने काही अटींच्या आधारावर पत्नीच्या घटस्फोट अर्जाला मंजूरी दिली आहे. खंरतर, अर्धा संसार थाटल्यानंतर आणि चार मुलांसह पतीला घटस्फोट देणं ही महिलेसाठी अत्यंत्र वाईट गोष्ट होती. पण पतीच्या त्रासाला कंटाळून महिलेने कठोर निर्णय घेतला. इतर बातम्या - विराटला झालंय काय? पहिल्याच कसोटी सामन्यात केला लाजीरवाणा रेकॉर्ड
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Pune

    पुढील बातम्या