मराठी बातम्या /बातम्या /पुणे /आधी पतीनं मारहाण केली मग दीरानं पाजलं टॉयलेट क्लिनर; पुण्यातील विकृत घटनेचं कारण समोर

आधी पतीनं मारहाण केली मग दीरानं पाजलं टॉयलेट क्लिनर; पुण्यातील विकृत घटनेचं कारण समोर

एका 26 वर्षीय विवाहितेवर नवरा आणि दीराकडून अमानुष अत्याचार करण्यात आला आहे.

एका 26 वर्षीय विवाहितेवर नवरा आणि दीराकडून अमानुष अत्याचार करण्यात आला आहे.

Crime in Pune: पुण्यातील गोखलेनगर परिसरात राहणाऱ्या एका 26 वर्षीय विवाहितेवर नवरा आणि दीराकडून अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुणे, 23 ऑगस्ट: पुण्यातील गोखलेनगर परिसरात राहणाऱ्या एका 26 वर्षीय विवाहितेवर अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका किरकोळ घरगुती कारणावरून वाद पेटल्यानंतर पतीनं फिर्यादी महिलेला बेदम मारहाण (Husband beat Woman) केली आहे. एवढंच नव्हे तर दीरानंही अन्य एका महिलेच्या मदतीनं आपल्या पीडित भावजयीला (Sister in law) टॉयलेट क्लिनर पाजलं (Brother in law give toilet cleaner to drink) आहे. या प्रकरणी पीडितेनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी पतीसह दीर आणि अन्य एका महिलेविरोधात गुन्हा दाखल (FIR Lodged) केला आहे.

गोखलेनगर परिसरातील रहिवासी असणारी 26 वर्षीय महिला आपल्या बहिणीसोबत फोनवरून बोलत होती. केवळ बहिणीसोबत फोनवरून बोलल्यामुळे पीडित महिलेचा घरातील मंडळींसोबत वाद झाला. फोनवर का बोलते असा जाब विचारत आरोपी पतीनं पीडितेला बेदम मारहाण केली. यानंतर घरातील अन्य एका महिलेनं पीडितेला घट्ट पकडलं आणि दीरानं घरातील हार्पिक हे टॉयलेट क्लिनर पाजलं आहे.

हेही वाचा-भानामतीच्या संशयातून दलित कुटुंबासोबत अमानुष कृत्य; भरचौकात हातपाय बांधले अन्...

टॉयलेट क्लिनर पाजल्यानंतर पीडितेची प्रकृती अचानक खराब झाली. तिला प्रचंड त्रास होऊ लागला. त्यामुळे पीडितेला पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या ठिकाणी पीडित महिलेवर सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पीडित महिलेनं चतुःश्रृगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी पतीसह दीर आणि अन्य एका महिलेविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा-डोक्यात खुर्ची घालत लाथा-बुक्क्यांनी मारहाण; लेकांनी जन्मदातीला दिल्या नरक यातना

केवळ आपल्या बहिणीसोबत फोनवरून बोलल्यामुळे एवढी भयानक शिक्षा दिल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस सध्या पीडितेचा जबाब नोंदवून घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास चतुःश्रृगी पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime news, Pune