पुणे, 9 जानेवारी : टिक टॉकस्टार गौतमी पाटील तिच्या डान्समुळे ओळखली जाते. मागच्या वर्षभरात गौतमी पाटील हे नाव चांगलंच चर्चेत आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटीलच्या अनेक कार्यक्रमांमध्ये प्रेक्षक गोंधळ घालताना पहायला मिळत आहेत. यातच आता पुण्यात शिरूरमध्येही प्रेक्षकांनी धुडगुस घातला.
नेमकं काय घडलं -
पुण्याच्या शिरूरमधील कवठे येमाई येथे रिल्सस्टार गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी रात्री पुन्हा अक्षरश: धुडगुस घातला. गौतमी पाटीलच्या अदाकारीवर प्रेक्षक बेभान होऊन थिरकले आहेत. येथील पंचायत समिती सदस्य डॉक्टर सुभाष पोकळे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी प्रेक्षकांनी गोंधळ घातला. तर तिच्या अदाकारीवर प्रेक्षक बेभान होऊन थिरकलेले पहायला मिळाले.
#पुणे: शिरूरच्या कवठे येमाईत गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांचा धुडगूस pic.twitter.com/SZpuW3MWXE
— News18Lokmat (@News18lokmat) January 9, 2023
गौतमी पाटील ही लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता. संपूर्ण महाराष्ट्रातून तिच्यावर टीका करण्यात आली. गौतमी पाटीलच्या लावणीवरून निर्माण झालेल्या वादानंतर गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमांवार कायमस्वरुपी बंदी आणण्याची मागणी करण्यात आली. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गौतमीचा मोठा चाहता वर्ग आहे. छोट्या गावातही गौतमी पाटीलच्या डान्सची क्रेझ पाहायला मिळते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dance video, Gautami Patil, Pune