Home /News /pune /

नाराज कार्यकर्त्यांना कसं खूश करायचं?, बिझी अजित पवारांनी सांगितलं सिक्रेट

नाराज कार्यकर्त्यांना कसं खूश करायचं?, बिझी अजित पवारांनी सांगितलं सिक्रेट

Ajit Pawar News: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) 73 व्या वर्धापनदिनानिमित्त पुणे येथे मुख्य शासकीय समारंभात उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

    पुणे, 26 जानेवारी: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) 73 व्या वर्धापनदिनानिमित्त पुणे येथे मुख्य शासकीय समारंभात उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. दरम्यान पुण्यात कार्यकर्ते अजित पवार यांच्यावर नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यावर अजित पवारांनी उत्तर दिलं आहे. निवडणुका तोंडावर आली असताना तुम्ही पुण्यात अॅक्टिव्ह नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत अशी बातमी समोर आली आहे. यावर अजित पवार यांनी आपण कशात बिझी असल्याचं सांगितलं आहे. अजित पवार यांनी यावर उत्तर देताना म्हटलं की, काही गोष्टी दाखवायच्या नसतात. सध्या कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळे त्यांना कसं खूश करायचं मला चांगलं माहित आहे, असं अजित पवार म्हणालेत. चित्रपटाला सुद्धा लाजवेल, या दोन भामट्यांनी तब्बल 250 तरुणींना फसवलं, आणि... दरम्यान सध्या माझं पहिलं प्राधान्य अर्थसंकल्प आहे. त्यात मी जरा बिझी आहे. निवडणूक संबंधी सर्व गोष्टी उघडपणे मीडियाला सांगून करायच्या नसतात, असंही त्यांनी म्हटलं आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ, पोलीस संचलन मैदान, शिवाजीनगर पुणे येथे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प, ओबीसी आरक्षण, निवडणुका यावर भाष्य केले. तसंच राज्याचा अर्थसंकल्प 11 मार्चला मी मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 28 फेब्रुवारीपासून अधिवेशन सुरू होतं. केंद्र सरकारचं अधिवेशन 1 फेब्रुवारीपासून सुरू होतं. हे अधिवेशन सुरू झाल्यावर केंद्रीय अर्थमंत्री प्रत्येक राज्यासाठी काय अर्थसंकल्प मांडत आहेत यावर प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांचं लक्ष असतं, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. संविधान महत्वाचे आहे हे आज प्रत्येक बाबतीत जाणवते केंद्रीय अर्थसंकल्प कसा मांडला जातो. त्यावर राज्याचा अर्थसंकल्प बाबत विचार होईल, असंही ते म्हणालेत. पाच वर्षातील जीएसटीचा परतावा जो मिळायला हवा होता तो पूर्ण मिळालेला नाही. उशिरा का होईना तो मिळेल, असंही अजित पवार यांनी सांगितलं आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Ajit pawar, NCP

    पुढील बातम्या