पुण्यात कोरोनाला कसं हरवणार? महापौरांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या 5 मागण्या

पुण्यात कोरोनाला कसं हरवणार? महापौरांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या 5 मागण्या

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाच महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत.

  • Share this:

पुणे, 30 जुलै : पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शहरात आज महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत पुण्यात कोरोनाला हरवण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी करायल्या हव्यात, याबाबत माहिती देत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाच महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत मांडलेले मुद्दे...

1. खाजगी हॉस्पिटल, बेड्स आणि अवाजवी बील

- 80% बेड्स ताब्यात घेण्याचे आदेश आहेत, मात्र कार्यवाही नाही

- बिलामध्ये नागरिकांची प्रचंड लूट असल्याच्या तक्रारी आहेत, त्यामुळे बिलांचे प्रिऑडिट करावे

- सेंट्रली बेड्स मॅनेजमेंट तातडीनं करण्यात यावे

(ससून /मनपा /खाजगी हॉस्पिटल)

- खाजगी लॅबवर तूर्त तरी कोणतेही नियंत्रण नाही आणि प्रशासनाचा लॅबशी समन्वय नाही.

- उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी नेमले आहेत, त्यांची यावर नियंत्रण आणावे

2. महापालिका आर्थिक स्थिती

- 4 हजार 443 कोटी जमा

- 3000 कोटी - महसुली / मॅन्डेटरी खर्च / पगार / मेन्टेनन्स

- 1400 - विकासकामे (650 कोटी मागील वर्षीच्या विकासकामे)

- शिल्लक 800 कोटी

- जवळपास 300 कोटी 75 कोटी जम्बो सेंटरला

- भांडवली कामांसाठी शिल्लक 400 कोटी राहिले, यासाठी दरवर्षी 3000 कोटींची कामे होतात.

- हा सर्व विचार करता राज्य सरकारने तातडीनं आर्थिक मदत जाहीर करावी

3. कोरोनाबाधित रुग्णांचा आगामी अंदाज...

- 55 हजार होणार जुलैअखेर (अंदाज 46 हजार इतका होता)

- आज 29 जुलै रोजी एकूण रुग्ण एकूण 51 हजार 738 तर उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या 17 हजार 861 इतकी आहे.

अंदाज

15 ऑगस्ट - एकूण 1 लाख रुग्ण

31 ऑगस्ट - एकूण 2 लाख रुग्ण

- यामुळे बेड्सचीची कमतरता, ऑक्सिजन, आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड्स मोठ्या प्रमाणावर लागतील.

- जम्बो सेंटर उभे उभारणीपर्यंत व्यवस्थाही अपुरी, त्याची सोय तातडीनं करण्यात यावी.

- 7 हजार ऑक्सिजन बेड्स, 4 हजार 065 आयसीयू बेड्स आणि 1 हजार 900 व्हेंटिलेटर बेड्सची आवश्यकता असणार आहे.

4. मृत्यूंचे प्रमाण व अवस्था...

ससून रुग्णालयात दररोज रोज 12मूत्यू कोरोनाव्यतिरिक्त होत आहेत, ही संख्या खाजगी हॉस्पिटलमध्ये महिन्याला 50 ते 100; म्हणजेच ढोबळपणे अधिक 400 ते 500 मृत्यू कोरोनाचे असतात, पण ते आकडेवारीत दर्शविले जात नाहीत.

- टेस्ट न होता हे मृत्यू होत आहेत, यात काही मृत्यू हॉस्पिटल पोहोचण्यापूर्वीचे आहेत.

- छातीच्या एक्स-रे ने अनेकांना कोरोनाचे निदान झाल्याची माहिती आहे.

- याबाबत सविस्तर चौकशी करुन भविष्यातील या मृत्युंची संख्या कमी करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावेत.

5. टेस्टिंग क्षमता वाढविणे

- NIV आणि ससूनमध्ये चाचणीची मर्यादित क्षमता असल्याने ससूनमध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठीची यंत्रणा उभी करणे याबाबत दोन महिने चर्चाच होत आहे, ही यंत्रणा त्वरित कार्यान्वित करण्यात यावी.

Published by: Akshay Shitole
First published: July 30, 2020, 6:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading