मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

कोरोना उपचारात Remdesivir कितपत प्रभावी? पुण्याच्या महिला शास्त्रज्ञाच्या संशोधनाला आलं यश

कोरोना उपचारात Remdesivir कितपत प्रभावी? पुण्याच्या महिला शास्त्रज्ञाच्या संशोधनाला आलं यश

कोरोना विषाणू प्रामुख्यानं रुग्णाच्या फुफ्फुसावर हल्ला (Corona virus attack on lungs) करतो. त्यामुळे भारतातील डॉक्टर जास्तीत जास्त रेमडेसिवीरचा वापर करत आहेत. पण हे औषध कोरोना रुग्णाच्या उपचारात खरंच प्रभावी आहे का? यावर महत्त्वपूर्ण संशोधन पुण्यातील मराठमोळ्या महिलेनं केलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

पुणे, 14 मे: मागील काही दिवसांपासून देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या (Corona cases) झपाट्यानं वाढत आहे. अशात कोरोना विषाणूची दुसरी लाट (Corona virus 2nd wave) अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वांसाठीच घातक ठरत आहे. कोरोना विषाणू प्रामुख्यानं रुग्णाच्या फुफ्फुसावर हल्ला (Corona virus attack on lungs) करत आहे. परिणामी रक्तात ऑक्सिजन घेऊन जाणाऱ्या पेशी कमकुवत होतं आहेत. त्यामुळे ऑक्सिजन पातळी घटून असंख्य रुग्णांचा मृत्यू होतं आहे. पण रुग्णांची गंभीर अवस्था लक्षात घेता, डॉक्टर रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन देतात. पण हे इंजेक्शन कोरोना रुग्णाच्या उपचारात खरंच प्रभावी आहे का? यावर अगदी जागतिक आरोग्य संघटनेपासून (WHO) इतरही अनेक तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत.

पण हे इंजेक्शन कोरोना रुग्णांच्या उपचारात प्रभावी ठरत असल्याचं संशोधन नुकतचं प्रसिद्ध करण्यात आलं आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या संशोधनात पुण्यातील मराठमोळी महिला शास्त्रज्ञ डॉ. अपूर्वा मुळे (Dr. Apurva Mule) हिने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अमेरिकेतील लॉस एंजलिस शहरात ‘सिडर्स सायनाय मेडिकल सेंटर’मध्ये कार्यरत डॉ. अपूर्वा मुळे  यांनी हे संशोधन केलं असून ‘सेल रिपोर्ट्स’ या आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत त्यांचं संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे.

डॉ. अपूर्वा मुळे यांच्यासोबतच डॉ. बॅरी स्ट्रिप यांचाही या संशोधनात मोलाचा वाटा आहे. मुळच्या पुण्यातील रहिवासी असणाऱ्या डॉ. मुळे यांनी पुण्यातील नामी फर्ग्युसन महाविद्यालयातून जैवतंत्रज्ञान विषयात पदवीचं शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर त्यांनी ब्रिटनच्या शेफिल्ड विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण आणि पीएचडी पूर्ण केली. तर अमेरिकेत पोस्टडॉकचं शिक्षण पूर्ण केलं आहे. आता त्या अमेरिकेतील लॉस एंजलिस याठिकाणी ‘सिडर्स सायनाय मेडिकल सेंटर’मध्ये कार्यरत आहेत.

हे वाचा-Explainer : लशीचा पहिला डोस घेऊन कोरोना झाल्यास दुसरा डोस कधी घ्यावा?

डॉ. अपूर्वा काळे यांच्या संशोधनातून महत्त्वपूर्ण बाबी स्पष्ट झाल्या असून रेमडेसिवीर वापराबाबतच्या शंका-कुशंका दूर होण्यास मदत झाली आहे. यावेळी डॉ. मुळे यानी दैनिक सकाळला सांगितलं की, हे संशोधन करत असताना कोरोनाशी निगडीत असणाऱ्या औषधांच्या प्रत्यक्ष चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यामध्ये रेमडेसिवीरचा वापर प्रभावी असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे संबंधित मॉडेलचा वापर भविष्यातही अशाप्रकारच्या आजारांवर करता येईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.

First published:

Tags: Coronavirus, Pune, Research