मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

'आम्ही त्यांना पुरून उरू', दिलीप वळसे पाटलांचा भाजपवर घणाघात

'आम्ही त्यांना पुरून उरू', दिलीप वळसे पाटलांचा भाजपवर घणाघात

'केंद्रातले भाजप सरकार राज्याशी सुडबुद्धीने वागत आहे आणि हे सर्वांना माहीत आहे. यासाठी वेगवेगळ्या संस्थांचा कसा वापर होतोय'

'केंद्रातले भाजप सरकार राज्याशी सुडबुद्धीने वागत आहे आणि हे सर्वांना माहीत आहे. यासाठी वेगवेगळ्या संस्थांचा कसा वापर होतोय'

'केंद्रातले भाजप सरकार राज्याशी सुडबुद्धीने वागत आहे आणि हे सर्वांना माहीत आहे. यासाठी वेगवेगळ्या संस्थांचा कसा वापर होतोय'

पुणे, 24 ऑक्टोबर : "राज्य सरकारला (mva government) कितीही त्रास दिला तरी महाविकास आघाडीचे सरकार 5 वर्ष टिकणार, आपल्याला त्रास देणाऱ्याला आपण पुरून उरणार" असा घणाघात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी केला.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज त्यांच्याच मतदारसंघात म्हणजे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील कळंब-चांडोली जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. कळंब येथे हा मेळावा पार पडला. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका संदार्भात हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

केंद्रातले भाजप सरकार राज्याशी सुडबुद्धीने वागत आहे आणि हे सर्वांना माहीत आहे. यासाठी वेगवेगळ्या संस्थांचा कसा वापर होतोय हेही सर्वांना माहीत आहे. मात्र यांनी कितीही त्रास दिला तरी काहीही फरक पडणारी नाही. हे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल, महाविकास आघाडी सरकारला त्रास देणाऱ्यांना आम्ही पुरून उरू, असा सणसणीत टोला पाटील यांनी भाजपला लगावला.

वाढलेली दाढी, लाल डोळे, चिंतित चेहरा; शाहरुखच्या व्हायरल फोटोमागचं सत्य..

'राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका मोठ्या प्रमाणावर जिंकायच्यात पण आपल्याला दुसरी कोणाची भीती नाही तर आपल्यातीलच काही नाराजांची भीती असल्याची उद्विग्नता सुद्धा त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

विधानसभेला जसे राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान होत तसं जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत झाले पाहिजे आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने सुद्धा लोकांसाठी चांगलं काम केलं पाहिजे, असा आशावाद त्यांनी बोलून दाखवला.

'खासदाराला अर्ज भरता येऊ नये', गुलाबराव पाटलांचा रक्षा खडसेंना टोला

जिल्हा परिषद गटातल्या प्रमुख लोकांनी निवडणुका जाहीर होण्याआधीच आपापल्या मतदार संघात लोकांमध्ये जाऊन त्यांचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे यासोबत सरकार आणि पक्षाची मराठा आरक्षणा संदर्भातील भूमिका  समजून सांगितली पाहिजे अशी अपेक्षा वळसे यांनी यावेळी व्यक्त केली.

'आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा परिषद पंचायत समिती आणि विविध संस्थांवर तरुणांना संधी देणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीनी गावागावात जाऊन लोकांना आतापासून भेटायला हवं आणि यावेळी आपल्यात राज्यातळू महत्वाची जबाबदारी असल्याने स्वतःला स्थानिक स्वराज्य निवडणुकामध्ये जास्त वेळ देता येणार नाही. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने राज्याचा राजकारणात मला मोठी संधी मला मिळाली. राज्यात पण मोठं व्हावं, आणि प्रचाराला पण यावं अस असेल तर जमणार नाही" असंही वळसे पाटील म्हणाले.

दरम्यान, आज दिवसभर गाजत असलेल्या साक्षीदार प्रभाकर यांनी केलेल्या 25 कोटीच्यागौप्यस्फोट प्रकरणावर मात्र वळसे पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलण्यास नकार दिला.

First published:

Tags: दिलीप वळसे-पाटील