VIDEO ''हॅलो, मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय'', ऐकणाऱ्यालाच बसला शॉक

VIDEO ''हॅलो, मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय'', ऐकणाऱ्यालाच बसला शॉक

''तुम्ही तक्रार केली होती त्याची दखल घेतली गेली का? तुम्हाला काही अडचण आली का? पोलीस स्टेशनमध्ये वागणूक कशी मिळाली?''

  • Share this:

पुणे 17 फेब्रुवारी : पुणे पोलिसांनी नागरिकांच्या तक्रारींचं निवारण व्हावं यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी स्वत:च या सेवांची पाहणी केली आणि काही लोकांना फोन करून खात्रीही करून घेतली. गृहमंत्र्यांनी सेवा सर्व्हिसच्या माध्यामातून तक्रारकर्त्यांशी फोन करून तक्रारीच निरसन झाल की नाही याची खात्री केल्याने त्या तक्रारकर्त्यालाच धक्का बसला. पोलिस स्टेशनला याचा थांगपत्ताही नव्हता की गृहमंत्री असं काही करतील म्हणून.

या उपक्रमाची पाहणी करण्यासाठी अनिल देशमुख यांनी पुण्यातल्या कोथरुड पोलीस स्टेशनला भेट दिली. त्यावेळी सर्व कर्मचारी त्यांना माहिती देत होते. तर देशमुखही बारीक-सारिक माहिती विचारत आढावा घेत होते. दररोज किती तक्रारी येतात. किती तातडीने त्याची दखल घेतली जाते, किती लवकर त्यावर उपाययोजना केल्या जातात याचा आढावा त्यांनी घेतला.

हा आढावा घेत असताना त्यांनी तक्रारदार दिलीप पवार यांना फोन केला. पवारांना आपल्या तक्रारीची दखल खुद्द गृहमंत्री घेतील याची स्वप्नातही कल्पना नव्हती. ''हॅलो, मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय'', असं पलिकडून आवाज आल्याबरोबर त्यांना धक्काच बसला.

VIDEO : डोंबिवलीत पार्किंगच्या वादातून तुफान हाणामारी, पोलिसाला बेदम मारहाण

पोलीस स्टेशनला गेलं की कामं नीट होत नाहीत. हेलपाटे खावे लागतात. असा लोकांचा समज असतो. ही प्रतिमा बदलण्यासाठी पुणे पोलिसांनी हा उपक्रम सुरु केलाय. जी साधी आणि लगेच होणारी कामं असतात त्यांना जास्त वेळ लागू नये ती तातडीने व्हावीत यासाठी ही सेवा सुविधा तयार करण्यात आली आहे.

त्यानंतर देशमुखांनी तुम्ही तक्रार केली होती त्याची दखल घेतली गेली का? तुम्हाला काही अडचण आली का? पोलीस स्टेशनमध्ये वागणूक कशी मिळाली? असे प्रश्न विचारले. पवार हे पोलीस स्टेशनमध्ये चारित्र्य पडताळणीच्या कामासाठी आले होते. त्यांच्या कामाची दखल घेत पोलिसांनी तातडीने त्यांचं काम मार्गी लावलं होतं. गृहमंत्र्यांच्या या कृतीने पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

First published: February 17, 2020, 10:03 AM IST

ताज्या बातम्या