Home /News /pune /

VIDEO : मध्यरात्री पुणेकराला आश्चर्याचा धक्का, तक्रारीसाठी फोन केला आणि समोर निघाले गृहमंत्री

VIDEO : मध्यरात्री पुणेकराला आश्चर्याचा धक्का, तक्रारीसाठी फोन केला आणि समोर निघाले गृहमंत्री

अनिल देशमुख यांनी महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

पुणे, 1 जानेवारी : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर रात्री दोन वाजता पुणे येथील कंट्रोल रूमला भेट दिली. यावेळी अनिल देशमुख यांनी महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसंच नियंत्रण कक्षात जाऊन काही नागरिकांच्या तक्रारीदेखील गृहमंत्र्यांनी ऐकून घेतल्या. रात्री दोन वाजता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः 100 नंबरचा तक्रारीचा कॉल घेतला आणि एका पुणेकराला आश्चर्याचा धक्का दिला. नववर्षाच्या निमित्ताने सेलिब्रेशन केलं जात असतानाच पुण्यातील एका परिसरात ध्वनीप्रदूषण केलं जात होतं. याबाबत एका जागरूक नागरिकाने तक्रार मांडण्यासाठी पोलिसांना फोन केला आणि समोर निघाले गृहमंत्री अनिल देशमुख. गृहमंत्र्यांना यावेळी सदर नागरिकाचं म्हणणं ऐकून घेतलं आणि संबंधितांवर कारवाई करण्यासाठी जवळच्या पोलीस ठाण्याला ही माहिती कळवली जाईल, असं आश्वासन दिलं. यावेळी देशमुख यांनी तक्रारीसाठी फोन करणाऱ्या पुणेकराला नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या. आपण तक्रारीसाठी केलेला फोन थेट राज्याच्या गृहमंत्र्यांनी घेतल्याने पुणेकरही भारावून गेला. दरम्यान, पोलीस दलाचा कुटुंब प्रमुख म्हणून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रात्री बारा वाजता पोलिसांसमवेत केक कापून नवीन वर्षाची सुरुवात केली.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Anil deshmukh, Pune news

पुढील बातम्या