मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

Pune : मुलाच्या आठवणीसाठी वडिलांनी उभारलं जगातलं भारी म्युझियम, पाहा Video

Pune : मुलाच्या आठवणीसाठी वडिलांनी उभारलं जगातलं भारी म्युझियम, पाहा Video

X
raja

raja dinkar kelkar museum जुन्या काळातील वस्तूंचे जतन करणारे राजा दिनकर केळकर संग्रहालय ही देखील पुण्याची एक खास ओळख आहे.

raja dinkar kelkar museum जुन्या काळातील वस्तूंचे जतन करणारे राजा दिनकर केळकर संग्रहालय ही देखील पुण्याची एक खास ओळख आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 26 जानेवारी : पुणे शहरात ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या अनेक वास्तू आहेत. त्याचबरोबर जुन्या काळातील वस्तूंचे जतन करणारे राजा दिनकर केळकर संग्रहालय ही देखील पुण्याची एक खास ओळख आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात या म्युझिअमची स्थापना झाली. तेव्हापासून हे म्युझियम पुणे शहराच्या वैभवात भर टाकत आहे.

कशी झाली सुरूवात?

केळकर संग्रहालयाचे व्यवस्थापकीय संचालक सुधन्वा रानडे यांनी या म्युझिमच्या स्थापनेचा इतिहास सांगितला आहे. 'पद्मश्री दिनकर केळकर उर्फ काकासाहेब व्यवसायाने ऑप्टिशन होते. त्यांना ऐतिहासिक कविता करण्याचा छंद होता. कवी अज्ञातवासी या टोपणनावानं त्यांच्या कविता प्रसिद्ध आहेत. काकासाहेबांनी 1920 च्या दशकापासून ऐतिहासिक वस्तू जमवण्यास सुरूवात केली. त्याला 1938 - 40 च्या दरम्यान संग्रहालयाचे स्वरूप देण्यात आले. काकासाहेबाचा मुलगा राजा याचे वयाच्या दहाव्या वर्षीच निधन झाले. त्याची आठवण म्हणून हे संग्रहाल उभारण्यात आले. या संग्रहालयाला त्याचं नाव देण्यात आलं. सुरुवातीला या संग्रहालयाचे नाव राजा संग्रह होतं. त्यानंतर राजा दिनकर केळकर हिस्टॉरिकल कलेक्शन असे नाव होते. तर 1975 च्या सुमारास या संग्रहालयाचे नाव राजा दिनकर केळकर संग्रहालय असे नामकरण करण्यात आले'.

काय पाहता येईल संग्रहालयामध्ये?

राजा दिनकर केळकर संग्रहालयत विविध मूर्ती, विविध कला कुसरीच्या वस्तू, दगडी, हस्तिदंताच्या, लाकडी कोरीव काम केलेल्या वस्तू, जुन्या राजा राजवाड्यांचे दरवाजे, कमानी, खिडक्या, जुनी वस्त्र प्रावरणे, सौंदर्यप्रसाधने, विविध हस्तकला शिल्पकला यांचा खजाना या संग्रहालयामध्ये पाहता येईल. एवढेच नाही तर या संग्रहालयामध्ये मस्तानी महाल देखील आहे.

Pune : मेटाव्हर्सची जादू, घरबसल्या पाहा राजा केळकर म्युझियमधील खजिना! Video

संग्रहालयाचा विस्तार व्हावा

जागे अभावी आम्ही संग्रहालयामध्ये फक्त संग्रहातील 11 टक्केच वस्तू लोकांसाठी  आम्ही दाखवू शकत आहोत. मात्र, केंद्र सरकार आणि राज्य सरकारने लक्ष घालून आमच्या म्युझियम ऑफ द सिटी या प्रकल्पाद्वारे सदर संग्रहालयाचा विस्तार व्हावा अशी अपेक्षा आहे, असं मतही सुधन्वा रानडे यांनी व्यक्त केले.

First published:

Tags: Local18, Pune