पुण्यात गणेशोत्सवात युरिया/खताचा वापर करून स्फोट घडवण्याची शक्यता

पुण्यात गणेशोत्सवात युरिया/खताचा वापर करून स्फोट घडवण्याची शक्यता

पिंपरी-चिंचवड शहरात आगामी काळात साजऱ्या होणाऱ्या धार्मिक उत्सवावर दहशतवादाचे सावट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • Share this:

गोविंद वाकडे, (प्रतिनिधी)

पिंपरी-चिंचवड, 26 ऑगस्ट: पिंपरी-चिंचवड शहरात आगामी काळात साजऱ्या होणाऱ्या धार्मिक उत्सवावर दहशतवादाचे सावट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. युरिया/ खताचा वापर करून स्फोट घडवून आणण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी पहिल्यांदाच पिंपरी शहरातील खत विक्रेत्यांना नोटीस बजावल्याची माहिती मिळाली आहे.

युरिया/ खताचा वापर करून स्फोट घडवून आणण्याची शक्यता नाकारत येत नसल्याने शहरातील सर्व खत विक्रेते आणि आणि खतांचा साठा करणाऱ्या गोडाऊन मालकांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील काळात येऊ घातलेल्या गणेशोत्सव त्याचबरोबर नवरात्रोत्सवादरम्यान स्फोट घडवून मोठा घातपात करण्याची शक्यता आहे. खत विक्रेत्यांनी प्रत्येक व्यवहाराची नोंद ठेवण्याची सक्त ताकीद देण्यात आली. त्यांची वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबर या आदेशच उल्लंघन केल्यास फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार असल्याचेही या नोटिशीत म्हटले आहे. पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रतिबंधात्मक आदेश पुढील दोन महिन्यासाठी लागू राहील.

पुण्यात भाजप नेत्याच्या घरावर दरोडा.. आई-वडील गंभीर जखमी

शिरूर तालुक्यातील केंदूर येथे भाजपचे तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब साकोरे यांच्या घरावर सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास दरोडा पडला. साकोरे यांच्या आई-वडिलांना चोरट्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत कोंडीबा विठोबा साकोरे व लक्ष्मीबाई कोंडीबा साकोरे हे या वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहे.

या घटनेत अडीच तोळ्याचे मंगळसूत्र चोरीला गेले. जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

उद्योगनगरीला मंदीची झळ..

देशभरात पसरत चाललेल्या मंदीच्या झळ उद्योग पिंपरी चिंचवडलाही सोसावी लागत आहे. या शहरात असलेल्या तीनही ओद्योगिक क्षेत्रातील शेकडो लघु उद्योजकांना मंदीचा मोठा फटका बसल्याने हजारो कामगार बेरोजगार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पिंपरी, भोसरी आणि चाकण MIDC परिसरात असलेल्या ऑटोमोबाईल क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या टाटा, बजाज , महिंद्रा, फोर्स, या सारख्या देशी आणि शेकडो विदेशी कंपन्यांमधील उत्पादनाला मोठी खीळ बसली आहे, ज्यामुळे ह्या कंपनीतील कामगारांवर बेरोजागारीची टांगती तलवार आहे तर ह्या कंपन्यांवर अवलंबून असलेल्या लघु उद्योजकांवर तर उपासमारीची वेळ आली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात येऊ घातलेल्या नव्या इलेक्ट्रॉनिक व्हेकलमुळे ही परिस्थिती ओढवलेल्याच बोललं जात आहे. मात्र, लघुउद्योजक हे मानायला तयार नाही आहेत.

VIDEO: सोलापूरमधील भीषण स्फोटात फटाक्यांचा कारखाना जळून खाक

Published by: Sandip Parolekar
First published: August 26, 2019, 1:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading