पुण्यात हॉटेलच्या लेडीज वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा.. मुलींचे केले चित्रिकरण

उच्चभ्रू हॉटेलच्या लेडीज वॉशरूममध्ये लावलेल्या छुप्या कॅमेऱ्यातून मुलींचे चित्रिकरण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 6, 2019 02:26 PM IST

पुण्यात हॉटेलच्या लेडीज वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा.. मुलींचे केले चित्रिकरण

गोविंद वाकडे,(प्रतिनिधी)

पिंपरी-चिंचवड,6 नोव्हेंबर: पुण्यात एका उच्चभ्रू हॉटेलच्या लेडीज वॉशरूममध्ये लावलेल्या छुप्या कॅमेऱ्यातून मुलींचे चित्रिकरण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हॉटेल व्यवस्थापकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हॉटेल कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रॅम देब नाथ असे आरोपीचे नाव असून तो फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

पोसिलांनी दिलेली माहिती अशी की, हिंजवडी फेज-1 परिसरातील उच्चभ्रू हॉटेल बी हाईव्ह रेस्टराँच्या लेडीज वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा आढळून आला. कॅमेरा ऑन होता. आरोपी रॅम देब नाथ याने हा कॅमेरा बसवला होता. हॉटेलमध्ये येणाऱ्या मुलींचे चित्रिकरण करण्याचा आरोपीचा हेतू होता. हॉटेल व्यवस्थापक राकेश शेट्टी (वय-35, रा.102, इंगळे, कॉर्नर, कर्वे नगर, पुणे.) यांनी दिलेल्या तक्रारीवरून

आरोपी रॅम देब नाथ वय-24, रा.श्रद्धा फॅसिलिटी सर्व्हिसेस, लक्ष्मी चौक, हिंजवडी पुणे.) याच्या विरोधात भादंवि कलम 511 आणि आयटी अॅक्ट कलम 72 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी रॅम देब नाथ हा हाऊस किपिंग म्हणून काम करत होता. त्याने लेडीज वॉशरूममध्ये छुपा कॅमेऱ्यातून मुलींचे चित्रिकरण केले आहे का, याचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे यांनी सांगितले आहे.

शिवसैनिकांचा 'राडा', 'इफ्को टोकिया'चे कार्यालय फोडले

Loading...

दरम्यान, पुण्यातील एका दुसऱ्या घटनेत पीक विम्याचे वाटप न करणाऱ्या इफ्को टोकियो कंपनीचे कार्यालय बुधवारी शिवसैनिकांनी फोडले. पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये इफ्को टोकियोचे कार्यालय आहे. शिवसेना स्टाईलने केलेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी विमा कंपनीच्या कार्यालायातील काचेचे दरवाजे, कॉम्युटर, खुर्च्यांची तोडफोड केली.

शहरप्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसैनिकांनी ही तोडफोड केली. वारंवार कंपनीकडे अर्ज, विनंती करुनही शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्यात आली नाही. त्यामुळे हे तीव्र आंदोलन छेडण्यात आले. विमा कंपन्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे दिले नाहीत, तर शिवसेनेच्या वतीने राज्यभरात अशा पद्धतीने आंदोलन करण्याचा इशाराही मोरे यांनी दिला आहे.

VIDEO : 'त्या' बैठकीबाबत संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 6, 2019 02:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...