Home /News /pune /

Weather Forecast: येत्या 4 दिवसात राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता; या जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

Weather Forecast: येत्या 4 दिवसात राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता; या जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

पुढील चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

पुढील चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

Weather Forecast Today: येत्या चोवीस तासात बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. परिणामी पुढील चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून (IMA) वर्तवण्यात आली आहे.

पुढे वाचा ...
    पुणे, 12 सप्टेंबर: मागील काही दिवसांपासून बंगालच्या उपसगारात (bay of bengal) हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र (low pressure area) निर्माण झालं आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी (heavy rainfall in maharashtra) लावली आहे. मराठवाडा आणि पूर्व विदर्भात जोरदार पाऊस कोसळल्यानंतर आता याठिकाणी पावसानं उघडीप घेतली आहे. पण कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि घाट परिसरात पावसाचा जोर कमी अधिक प्रमाणात कायम आहे. आजही राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बंगलाच्या उपसागरात तयार झालेलं हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र सध्या तीव्र झालं आहे. तसेच येत्या चोवीस तासात हे हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुढील चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तुलनेनं कोकण आणि घाट परिसरात पावसाचा जोर अधिक असेल, त्यामुळे संबंधित जिल्ह्यातील नागरिकांना हवामान तज्ज्ञांकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हेही वाचा-Watch Video: भातसा धरण ओव्हरफ्लो, धरणाचे पाच दरवाजे उघडले आज पुणे, सातारा, कोल्हापूर, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या सहा जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या तीन ते चार दिवसांत या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मुंबई, ठाणे, नाशिक आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांनाही पुढील काही तासांत पाऊस झोडपणार आहे. हेही वाचा-बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र तीव्र; राज्यात पावसाचा जोर वाढणार दुसरीकडे संपूर्ण विदर्भात देखील विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्यानं आज विदर्भात बुलढाणा, वाशीम, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या अकरा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान 30 ते 40 किमी प्रतितास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच आकाशात मोठ्या प्रमाणात विजा चमकू शकतात, त्यामुळे लांबचा प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra, Pune, Weather forecast

    पुढील बातम्या