मराठी बातम्या /बातम्या /पुणे /अंदमानच्या समुद्रात नवं संकट; राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढील 5 दिवस High Alert

अंदमानच्या समुद्रात नवं संकट; राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढील 5 दिवस High Alert

Weather in Maharashtra: पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Weather in Maharashtra: पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Weather in Maharashtra: पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुणे, 12 नोव्हेंबर: अरबी समुद्रासह (Arabian Sea) बंगालच्या उपसागरात (Bay of bengal) निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचं क्षेत्राचा (Low pressure area) प्रभाव म्हणून मुंबईसह महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान निर्माण झालं आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र भारतीय किनारपट्टी पासून दूर गेलं आहे. यानंतर आता अंदमानच्या समुद्रात नवीन संकट उभं ठाकलं आहे. या ठिकाणी देखील हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होतं आहे. पुढील 24 तासात याची तीव्रता वाढणार आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाची (Rain in maharashtra) शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. उद्यापासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांसाठी राज्यात विविध ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

आज सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस धडकण्याची शक्यता आहे. यासोबतच रत्नागिरी, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या सहा जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. संबंधित जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. पण उद्यापासून मात्र राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-कोविड -19 विरूद्धच्या Covaxin लसीसंदर्भात समोर आली नवी माहिती

उद्या दक्षिण कोकण, दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळणार आहे. हवामान खात्याने उद्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि बीड या दहा जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. संबंधित जिल्ह्यात उद्या मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळणार आहे. दरम्यान, गतिमान वारे वाहणार असून याचा वेग 30 ते 40 किमी प्रतितास इतका राहणार आहे.

हेही वाचा-Corona नं पुन्हा वाढवला तणाव, 24 तासात मृतांची संख्या भयावह

3 दिवस पुण्यात कोसळधार...

ऑक्टोबर महिन्यात शेवटी राज्यात पावसाने उघडीप घेतल्यानंतर, 1 नोव्हेंबरपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. नैऋत्य मोसमी पाऊस परतल्यानंतर, ईशान्य मान्सूनच्या सरी पुण्यातही कोसळल्या आहेत. रविवारपासून (14 नोव्हेंबर) पुढील तीन दिवस पुण्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तिन्ही दिवसांसाठी पुण्यात येलो अलर्ट जारी केला आहे. या 3 दिवसांत पुण्यासह दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, घाट परिसर, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

First published:
top videos

    Tags: Pune, Weather forecast, महाराष्ट्र