Home /News /pune /

Weather Alert: पुढील 3 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, पुण्यासह कोकणात IMD कडून हाय अलर्ट

Weather Alert: पुढील 3 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, पुण्यासह कोकणात IMD कडून हाय अलर्ट

Weather Update: येत्या तीन दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा मुसळधार ते अतिमुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून (IMD Alerts) देण्यात आला आहे.

    पुणे, 06 सप्टेंबर: ऑगस्ट महिन्यांत महाराष्ट्रात मान्सूननं (Monsoon in Maharashtra) निराशा केल्यानंतर, आता सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला मान्सूननं राज्यात दिमाखात आगमन केलं आहे. मागील पाच-सहा दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी (Heavy Rainfall in Maharashtra) लावली आहे. गेल्या चोवीस तासांत मुंबई (Mumbai), पुणे (Pune) आणि ठाणे (Thane) परिसरात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. त्यानंतर आता येत्या तीन दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा मुसळधार ते अतिमुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून (IMD Alerts) देण्यात आला आहे. सध्या बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस महाराष्ट्रात सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहेत. पूर्व विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात याचा सर्वाधिक प्रभाव राहणार आहे. उद्यापासून टप्प्याटप्प्यानं पाऊस विदर्याकडून कोकणाकडे सरकणार आहे. परिणामी पुढील तीन दिवस राज्यात अनेक जिल्ह्यांना हवामान खात्यानं हाय अलर्ट दिले आहेत. हेही वाचा-Corona Vaccine घेतल्यावर दिसली ही लक्षणं तर सावधान; सरकारनं दिला इशारा कोकणातील काही भागात अतिवृष्टीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. उत्तर कोकणात याचा सर्वाधिक प्रभाव राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या चार जिल्ह्यांना हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड अशी एकूण चौदा जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यांत वेगवान वाऱ्याच्या साथीनं जोरदार सरी कोसळणार आहेत. हेही वाचा-PHOTOS: मुंबईत Sanitization साठी ड्रोनचा वापर, पालिकेची अनोखी मोहिम आजपासून पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा जोर वाढतच जाणार आहे. उद्या आणि परवा देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. उद्या संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसणार आहे. 8 सप्टेंबर रोजीही कमी अधिक प्रमाणात राज्यात हीच परिस्थिती कायम राहणार आहे. तसेच काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra, Todays weather, Weather forecast

    पुढील बातम्या