• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • Weather Forecast: उद्यापासून 4 दिवस पुण्यात पावसाची धुवाधार बॅटींग; आज या जिल्ह्यांना हाय अलर्ट

Weather Forecast: उद्यापासून 4 दिवस पुण्यात पावसाची धुवाधार बॅटींग; आज या जिल्ह्यांना हाय अलर्ट

Weather Forecast: जवळपास दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळाच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाने (Rain in maharashtra)वापसी केली आहे. काल कोल्हापूर परिसरात कोसळलेल्या जोरदार पावसाने दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची पुरती धांदल उडाली आहे.

 • Share this:
  पुणे, 02 नोव्हेंबर: जवळपास दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळाच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाने (Rain in maharashtra) वापसी केली आहे. काल कोल्हापूर परिसरात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे दिवाळी खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची पुरती धांदल उडाली आहे. सोमवार सकाळपासूनच कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग परिसरात ढगाळ हवामानाची (Cloudy weather) नोंद झाली होती. दुपारनंतर संबंधित जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. आकाशात विजा चमकत असताना लांबचा प्रवास टाळावा आणि मोठ्या झाड्याच्या आडोशाला थांबू नये, असा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. हेही वाचा-Corona मुळे मानसिक तणावात वाढ, 2020 मध्ये देशात दररोज 31 मुलांनी केली आत्महत्या उद्यापासून राज्यात पुढील चार पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. उद्या राज्यात पुण्यासह दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील एकूशण 10 जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. उद्या पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, लातूर, आणि नांदेड या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांत उद्या मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळणार आहे. हेही वाचा-Covaxin ला मिळणार मंजुरी? महत्त्वाच्या बैठकीआधी कंपनीने सादर केला अतिरिक्त डेटा संबंधित जिल्ह्यात शनिवार (6 नोव्हेंबर) पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. शनिवारनंतर राज्यात हळुहळू पावसाचा जोर कमी होणार आहे. पण ऐन दिवाळी सणाच्या दिवसात राज्यात पावसाचे इशारे देण्यात आल्याने दिवाळीच्या सुट्ट्या साजरा करण्यासाठी बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांची धांदल उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरम्यानच्या काळात नागरिकांनी लांबचा प्रवास टाळावा, असा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: