Home /News /pune /

विकेंडनंतर राज्यात पुन्हा पावसाचं कमबॅक; पुण्यासह या जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

विकेंडनंतर राज्यात पुन्हा पावसाचं कमबॅक; पुण्यासह या जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

Latest Weather Update: राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान तयार झालं असून विकेंडनंतर राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (heavy to very heavy rainfall) शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    पुणे, 27 नोव्हेंबर: गेल्या चार दिवसापासून राज्यात पावसानं (Rainfall in Maharashtra) विश्रांती घेतली आहेत. त्यानंतर आता अरबी समुद्र (Arabian Sea) आणि तामिळनाडू किनारपट्टी परिसरात पुन्हा एकदा हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र (Low pressure area) निर्माण झालं आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान तयार झालं असून विकेंडनंतर राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (heavy to very heavy rainfall) शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोमवारपासून (29 नोव्हेंबर) पुढील तीन दिवस राज्यात अनेक ठिकाणांना हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या राज्यात कोणताही इशारा दिला नाही. पण विकेंडनंतर राज्यात पावसाचा जोर वाढणार असून दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, घाट परिसर, उत्तर महाराष्ट्र आणि लगतच्या मराठवाडा परिसरात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. सध्या भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील बहुतांशी जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. हेही वाचा-Corona: ओमिक्रॉनने वाढवली चिंता; महाराष्ट्राने मोदी सरकारकडे केली मोठी मागणी याचाच परिणाम म्हणून 29 नोव्हेंबरपासून पुढील तीन दिवस राज्यात देखील विविध ठिकाणी पावसाची हजेरी लागणार आहे. सोमवारी (29 नोव्हेंबर) हवामान खात्याने पुण्यासह, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या आठ जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow) जारी करण्यात आला आहे. याठिकाणी मेघगर्जनेसह वरुणराजा गरजणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय सोमवारी मुंबईसह, ठाणे, नाशिक, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या सहा जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळणार आहे. हेही वाचा-धाकधूक वाढली, SDM कॉलेजमध्ये 281 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण मंगळवार आणि बुधवारी राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने मंगळवारी पुणे- मुंबईसह एकूण 14 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. मंगळवारी प्रामुख्याने संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. बुधवारी कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra, Weather forecast

    पुढील बातम्या