मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

उद्यापासून पुण्यात धुवाधार पावसाची शक्यता; आज 'या' 11 जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

उद्यापासून पुण्यात धुवाधार पावसाची शक्यता; आज 'या' 11 जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

Weather In Maharashtra: आज दक्षिण कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्यापासून राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Weather In Maharashtra: आज दक्षिण कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्यापासून राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Weather In Maharashtra: आज दक्षिण कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्यापासून राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 13 नोव्हेंबर: अरबी समुद्रासह (Arabian Sea) बंगालच्या उपसागरात (Bay of bengal) निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचं क्षेत्राचा (Low pressure area) प्रभाव म्हणून मुंबईसह महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान निर्माण झालं आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र भारतीय किनारपट्टी पासून दूर गेलं आहे. पण आता अंदमानच्या समुद्रात नवीन संकट उभं ठाकलं आहे. या ठिकाणी देखील हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होतं आहे. पुढील 24 तासात याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाची (Rain in maharashtra) शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे.

आज दक्षिण कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्यापासून राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांसाठी राज्यात विविध ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आले आहेत. आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर आणि नांदेड या अकरा जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे.

हेही वाचा-कोरोनामुळे चव गेली ती परत आलीच नाही, सडक्या अंड्यासारखी लागते चव

आज सकाळपासूनचं दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण, घाट परिसर आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय गोवा, कर्नाटक, केरळ, आणि आंध्र प्रदेशातील अनेक जिल्ह्यांवर देखील तीव्र पावसाचे ढग दाटले आहेत. गेल्या आठवड्यापासून तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांना मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्यानं पुरस्थिती निर्माण झाली आहे. येथील अस्मानी संकट कायम असून पुढील चोवीस तासांत याठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-Corona बाबत भारतानं सावध होण्याची गरज, नाहीतर होईल युरोपसारखी परिस्थिती

उद्यापासून पुण्यात धुवाधार पाऊस...

गेली काही दिवस पुण्यात पावसानं उघडीप घेतल्यानंतर, उद्यापासून पुन्हा एकदा पुण्यात जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने उद्यापासून पुढील चार दिवस पुण्यात येलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यानच्या चार दिवसांत पुण्यासह दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि घाट परिसरात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुण्यात चारही दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

First published:

Tags: Pune, Weather forecast, महाराष्ट्र