Elec-widget

पुणेकरांनो सावधान! आजही अतिवृष्टीचा इशारा.. आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू, 60 जनावरे दगावली

पुणेकरांनो सावधान! आजही अतिवृष्टीचा इशारा.. आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू, 60 जनावरे दगावली

हवामान विभागाने पुण्यात आजही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुण्यात अभूतपूर्व नुकसान झाले आहे.

  • Share this:

अद्वैत मेहता,(प्रतिनिधी)

पुणे, 26 सप्टेंबर: पुण्यात बुधवारी रात्री ढगफुटीसदृष झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरश: हाहाकार उडवला आहे. पुण्यात एका रात्रीत पावसाने 10 बळी घेतले आहेत तर संपूर्ण जिल्ह्यातील मृतांचा आकडा 17 वर पोहोचला आहे. पावसात तब्बल 60 जनावरे दगावली आहेत. हवामान विभागाने पुण्यात आजही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

पुण्यात अभूतपूर्व नुकसान झाले आहे. या पावसाचा हजारो नागरिकांना फटका बसला आहे. शहरात नाले, ओढे वळवून अनधिकृत बांधकामे झाली असून त्याचा आढावा घेऊन कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिला आहे. मदत आणि बचाव कार्याला प्राधान्य देण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे. विशेष करून कात्रज, आंबेगाव तसेच सिंहगड रोड परिसरातील ओढे नाले ओव्हरफ्लो होऊन त्यांचे पाणी नागरी वस्त्यांमध्ये शिरले आहे. अनेक सोसायट्या तसेच झोपडपट्टी भागात पाणी शिरले. रस्ते पाण्याखाली जाऊन त्यांना ओढ्याचे स्वरुप आले आहे.

या आमदाराने केला आरोप

खडकवासलाचे भाजप आमदार भीमराव तापकीर यांनी पुण्यातील पूरस्थितीला प्रशासन जबाबदार असल्याचे म्हटले आहे. प्रशासनाने दिरंगाई केल्याचाही आमदार तापकीर यांनी आरोप केला आहे. कात्रजमध्ये बिल्डराने केलेले अवैध बांधकाम, अतिक्रमणामुळे ओढे, नाले अरुंद झाल्याचेही आमदार तापकीर यांनी म्हटले आहे. पालिका, राज्य, केंद्रात आमचे सरकार असून तात्काळ नुकसान भरपाई मिळवून देणार असल्याचे आश्वासनही आमदार तापकीर यांनी केले आहे.

Loading...

पुण्यात सिंहगड रस्त्यावर वडगावजवळील नाल्यात अनेक वाहने अडकली आहेत. Jcb च्या सहाय्याने वाहने काढली जात आहेत. NDRF ची तीन पथके यासाठी घटनास्थळी दाखल झाली आहेत. त्यामुळे महापालिकेच्या यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा महापौरांनी दिला आहे.

पुणे शहराला बुधवारी रात्री मुसळधार पावसाने झोडपून काढले. आंबील ओढा ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे लोकांच्या घरात पाणीच पाणी शिरलं आहे. कात्रज, बिबवेवाडी, सहकारनगर, हनुमाननगर, दत्तवाडी, दांडेकर पूल कोल्हेवाडी, किरकीटवाडी, मांगडेवाडी भागातील घरांमध्ये गुडघ्याभर पाणी शिरले आहे. अनेक भागात विजपुरवठा बंद करण्यात आला आहे. कात्रज नवीन बोगद्यात पाणी साचल्याने वाहने अडकून पडली आहेत. एनडीआरएफच्या तुकड्या कात्रजमध्ये दाखल झाल्या आहेत. दांडेकर पूल इथल्या ओढ्याशेजारील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांनी तात्काळ मदतीचे आवाहन केले आहे.

पुणे: पाण्यात अडकलेल्या चिमुकल्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 26, 2019 04:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...