Home /News /pune /

Weather Update: राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता; पुण्यासह 18 जिल्ह्यांत हाय अलर्ट

Weather Update: राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता; पुण्यासह 18 जिल्ह्यांत हाय अलर्ट

आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Weather Update: आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (heavy to very heavy rainfall alerts) इशारा देण्यात आला आहे.

    पुणे, 07 सप्टेंबर: गेल्या पाच-सहा दिवसांपासून राज्यात मान्सूनचा जोर (Monsoon in maharashtra) वाढला आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (heavy to very heavy rainfall alerts) इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून (IMD alerts) वर्तवण्यात आली आहे. कोकणात आज अनेक ठिकाणी तीव्र मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी परिसरातील नागरिकांनी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज राज्यात एकूण 16 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange alert) देण्यात आला आहे. तर रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यांत रेड अलर्ट (Red alert) जारी केला आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे. पुढील काही तासात या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. तर पुण्यासह सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, परभणी, नांदेड, अकोला आणि अमरावती या सोळा जिल्ह्यांना हवामान खात्यानं आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर उर्वरित जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. हेही वाचा-इतक्या वेगाने का पसरतोय Delta variant? संशोधकांना सापडलं मुख्य कारण सध्या मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकला असून, राजस्थानच्या बिकानेरपासून, जयपूर, गुणा, गोंदिया ते बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रापर्यंत सक्रिय झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिण भागात समुद्रसपाटीपासून 3.1 ते 7.6 किलोमीटर उंचीवर परस्पर विरोधी वारे वाहत आहेत. त्यामुळे राज्यात सर्वत्र पावसासाठी पोषक हवामान तयार झालं आहे. हेही वाचा-काय सांगता? कोरोना होऊन गेलेल्यांना लस घेण्याची गरजच नाही? जाणून घ्या सविस्तर आज सकाळपासूनच मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. पुढील काही तासांत अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. उद्यापासून राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. उद्या उत्तर महाराष्ट्र, घाट परिसर आणि कोकणातील काही जिल्हे वगळता राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता आहे. त्यानंतर पुढील तीन दिवस राज्यात हळुहळू पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra, Pune, Weather update

    पुढील बातम्या