• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • VIDEO: रायगड, रत्नागिरी, पुण्याला मुसळधार पावसाने झोडपलं; पुणे-नगर महामार्गावर साचले पाणी, पुढील 4 दिवस पावसाचे

VIDEO: रायगड, रत्नागिरी, पुण्याला मुसळधार पावसाने झोडपलं; पुणे-नगर महामार्गावर साचले पाणी, पुढील 4 दिवस पावसाचे

Heavy rainfall in Raigad, Ratnagiri, Pune: राज्यातील विविध भागांत अवकाळी पाऊस पडत आहे.

  • Share this:
रायचंद शिंदे, प्रतिनिधी पुणे, 29 मे: राज्यातील विविध भागांत अवकाळी पाऊस (unseasonal rain) जोरदार बरसत आहे. सायंकाळच्या सुमारास सुरू झालेल्या या अवकाळी पावसाने रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), पुणे (Pune), वाशिम (Washim) जिल्ह्याला चांगलेच झोडपले. अचानक झालेल्या या अवकाळी पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली तर या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना गारवा अनुभवायला मिळत आहे. पुण्यात रस्त्यावर साचले पाणी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात शिक्रापूर, सणसवाडी, पिंपळे जगताप परिसराला आज सायंकाळी पावसाचं रुद्र रूप पाहायला मिळालं. हा परिसर पावसाने झोडपून काढला. विजांच्या कडकडाटासह वादळी वारा यामुळे वरून राजाचे रौद्र रूप पाहायला मिळालं. पावसामुळे पुणे-नगर महामार्गवरील आणि चाकण-शिक्रापूर रोडवरील वाहतूक संथ गतीने झाली होती. तर वाहनचालकांना कसरत करूनच आपली वाहने चालवावी लागत होती. याशिवाय अनेक ठिकाणी शेती सुद्धा पाण्याखाली गेली आणि मोठं मोठी तळी साचली होती. रत्नागिरीत सखल भागात साचले पाणी रत्नागिरी जिल्ह्यातही अवकाळी पाऊस बरसला. खेड परिसरात मुसळधार पाऊस बरसला. विजांच्या कडकडाटासह मुसळधार झालेल्या पावसामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. तर अनेक ठिकाणी सखल भागात पावसाचे पाणी साचले. रायगड जिल्ह्यात महाड पोलादपूर माणगाव या दक्षिण भागात पाऊस पडल्याने गर्मीने हैराण झालेले नागरिकांना गारवा अनुभवायला मिळत आहे. दुपारी सुरवात झालेला पाऊस संध्याकाळपासून जोरदार पडत आहे. यासोबतच वाशिम जिल्ह्यातील मागेगाव शहरासह तालुक्यातही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. VIDEO: मुंबईत शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांत राडा; आपआपसात भिडले कार्यकर्ते पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज 30 मे 2021 कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. विदर्भातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसोट्याचा वारा वाहण्याची शक्यता 31 मे 2021 कोकण - तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. विदर्भातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसोट्याचा वारा वाहण्याची शक्यता 1 जून 2021 कोकण - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. विदर्भातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसोट्याचा वारा वाहण्याची शक्यता 2 जून 2021 कोकण - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. विदर्भातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसोट्याचा वारा वाहण्याची शक्यता
Published by:Sunil Desale
First published: