• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • Health Department Exam : 'आज कुठेही पेपर फुटला नाही' आरोग्य विभागाने आरोप फेटाळले

Health Department Exam : 'आज कुठेही पेपर फुटला नाही' आरोग्य विभागाने आरोप फेटाळले

'बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे तीन विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक उपरकरण वापरत असल्याचे आढळून आल्याने याबाबत पोलीस तपास सुरू आहे'

'बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे तीन विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक उपरकरण वापरत असल्याचे आढळून आल्याने याबाबत पोलीस तपास सुरू आहे'

'बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे तीन विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक उपरकरण वापरत असल्याचे आढळून आल्याने याबाबत पोलीस तपास सुरू आहे'

  • Share this:
पुणे, 31 ऑक्टोबर : आरोग्य विभागाकडून (Health Department Recruitment exam) घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये आजही गोंधळ झाल्याचे पाहण्यास मिळाले. काही पुण्यात (pune) आणि भंडाऱ्यात (bhandara) पेपर फुटल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला. पण परीक्षा ही सुरळीत पार पडली आहे. काही तक्रारी असल्यास आरोग्य विभागाला कळावे असं आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे. आरोग्य विभागाचा गट- क आणि ड ची परीक्षा पार पडली.  पुणे आणि भंडाऱ्यामध्ये पेपर फुटल्याचा आरोप केला आहे. पण यावर माहिती आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील (archana patil) यांनी खुलासा केला आहे. 'आरोग्य विभागातील गट ड संवर्गातील पदांसाठीची लेखी परीक्षा राज्यातील १३६४ केंद्रांवर सुरळीतपणे पार पडली. काही विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र, परीक्षा केंद्र संदर्भात आलेल्या अडचणींचे त्वरीत निराकरण करुन विद्यार्थी परीक्षेस बसले' असं पाटील यांनी सांगितलं. घरातील लोकांच्या घोरण्यामुळे त्रस्त आहात का? हे 5 सोपे उपाय येतील तुमच्या कामी 'भंडारा जिल्ह्यातील तुमसर आणि मोहाडी येथे काही परिक्षार्थींनी पेपर फुटीच्या संशय घेतला. त्यांच्या शंकेचे निरसन करुनही त्यांनी परीक्षा दिलेली नाही. बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे तीन विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक उपरकरण वापरत असल्याचे आढळून आल्याने याबाबत पोलीस तपास सुरू आहे, अशी माहितीही पाटील यांनी दिली. काही माध्यमांमधून पेपर फुटीच्या अनुषंगाने बातम्या प्रसारित होत आहेत. मात्र सर्व केंद्रावर आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी पूर्णपणे नियंत्रण करीत होते. याबाबतची खात्रीशीर माहिती असल्यास ती पुराव्यासह आरोग्य विभागाला देण्याचे आवाहन डॉ.अर्चना पाटील यांनी केले. घरातील लोकांच्या घोरण्यामुळे त्रस्त आहात का? हे 5 सोपे उपाय येतील तुमच्या कामी पुण्यात काही विद्यार्थ्यांनी गट ड चा पेपर फुटल्याची आरोप केला होता. काही ठिकाणी पेपरच्या गठ्ठयाचे सील तुटलेले होते, असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं. तर दुसरीकडे जळगावमध्ये आरोग्य विभागाच्या ड गटाची परीक्षा पार पडली. पण यवतमाळ येथून आरोग्य विभागाची परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका परिक्षार्थीला ऐन परीक्षेचा वेळी परिक्षार्थीचा रोल नंबर बदलण्यात आले आणि परीक्षा केंद्र देखील बदलण्यात आले. त्यामुळे परिक्षार्थीचा चांगलाच गोंधळ उडाला.
Published by:sachin Salve
First published: