Home /News /pune /

जमिनीचा वादातून चुलत भावाने काढला चुलत भावाचा काटा, चाकूने केले सपासप वार

जमिनीचा वादातून चुलत भावाने काढला चुलत भावाचा काटा, चाकूने केले सपासप वार

 राहुल हा पूर्वीपासून सराईत गुन्हेगार होता.  राहुल मोहिते आणि चुलत भाऊ यांच्याबरोबर जमिनीवरुन नेहमी वाद करत होता.

राहुल हा पूर्वीपासून सराईत गुन्हेगार होता. राहुल मोहिते आणि चुलत भाऊ यांच्याबरोबर जमिनीवरुन नेहमी वाद करत होता.

दोघांनी राहुलवर धारदार हत्याराने डोक्यात पाठीत, तोंड, गळ्यावर आणि हातावर सपासप वार केले.

खेड, 08 सप्टेंबर : जमिनीच्या वादावरुन ( land dispute ) चुलत भावाने (brother murder) मित्राच्या मदतीने धारदार हत्याराने वार (murder) करुन चुलत भावाचा निर्घृणपणे खून केला आणि त्यानंतर त्याचा  मृतदेह चास-कमान धरणाच्या डाव्या कालव्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल मोहिते (rahul mohite) असं खून झालेला तरुणाचं नाव आहे.  राहुल हा पूर्वीपासून सराईत गुन्हेगार होता.  राहुल मोहिते आणि चुलत भाऊ यांच्याबरोबर जमिनीवरुन नेहमी वाद करत होता. या वादाचा राग मनात धरुन शंकर मोहिते आणि सचिन मोहिते यांनी मित्रांच्या मदतीने राहुल मोहिते याच्या खूनाचा कट रचला. चार्ज झाल्यानंतर स्मार्टफोनमध्ये झाला ब्लास्ट, भयंकर PHOTO व्हायरल दोघांनी राहुलवर धारदार हत्याराने डोक्यात पाठीत, तोंड, गळ्यावर आणि हातावर सपासप वार केले. वार वर्मी लागल्यामुळे राहुलचा जागीत मृत्यू झाला. त्यानंतर कोणताही पुरावा मागे राहु नये म्हणून त्याचा मृतदेह कालव्यात फेकून दिला. पण, स्थानिकांना राहुलचा मृतदेह आढळून आला. स्थानिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि तपास सुरू केला.  पोलिसांनी राहुलची ओळख पटवली. त्यानंतर चुलत भाऊ आणि त्यांच्यात वाद असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी खुनाची कबुली दिली. हत्येचा तपास करत राजगुरुनगर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. बापरे! 100 टक्के लसीकरण होऊनही इस्रायलमध्ये कोरोनाचा कहर, जगासमोर नवं आव्हान या कारवाईत पोलीस निरिक्षक सतिष गुरव, पोलीस हवालदार, स्वप्निल गाढवे, निखील गिरीगोसावी, सचिन जीतकर,शेखर भोईर यांनी तपास पाहिला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे
First published:

Tags: Khed, Pune

पुढील बातम्या