Home /News /pune /

पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांनो, सतर्क राहा! डॉक्टराच्या आईंसोबत घडला भयंकर प्रकार

पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांनो, सतर्क राहा! डॉक्टराच्या आईंसोबत घडला भयंकर प्रकार

पिंपरी शहरातील निगडी प्राधिकरणमधील अत्यंत उच्चभ्रू परिसरात असलेल्या गायत्री हेरिटेज सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे.

पिंपरी चिंचवड, 11 ऑगस्ट : 73 वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून तिला जबर मारहाण करत, चोरट्यांनी  सुमारे 4 लाखांचे दागिने लुटल्याचा धक्कादायक प्रकार  पिंपरी चिंचवडमध्ये घडला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पिंपरी शहरातील निगडी प्राधिकरणमधील अत्यंत उच्चभ्रू परिसरात असलेल्या गायत्री हेरिटेज सोसायटीमध्ये सोमवारी रात्री 10 30 च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत 73 वर्षीय हेमलता पाटील जखमी झाल्या आहे. त्यांना खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले.

लहान भाऊ मोठ्याच्या जीवावर उठला, रस्त्यावर पाडून चाकूने केले वार, LIVE VIDEO

हेमलता यांची कन्या डॉ. कविता वर्मा यांनी दिलेल्या माहिती नुसार, त्यांची आई म्हणजे हेमलता या घरी एकट्याच होत्या. त्याचाच फायदा घेऊन दोन तरुण घराच्या मागच्या दारातून घुसले आणि एकाने तोंड दाबून मारहाण करायला सुरुवात केली तर दुसऱ्याने हेमलता यांच्या अंगावरील दागिने काढू लागला. काही वेळाने चोरांनी कपाटाची चावी घेऊन त्यात ठेवलेले दागिने आणि रोख रक्कमही घेतली आणि पुन्हा मारहाण करून पळून गेले. साधारण 11 वाजेच्या सुमारास हेमलता यांनी आपल्या मुलीला फोन करून ही घटना कळवली. कविता या स्वतः डॉक्टर असल्याने त्यांनी त्यांच्या आईला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले आणि आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

महाविकास आघाडीत शिवसेनेची ताकद वाढली, मोठ्या मंत्र्याने बांधले शिवबंधन दरम्यान, निगडी पोलीस स्टेशनमधील कर्मचारी अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहिणी केली.  घराच्या मागच्या दरवाजातून आत शिरण्यापासून कपाटाची चाबी मिळविण्यापर्यंत सर्व माहित असल्याने दरोडेखोरांनी पाळत ठेऊन हा प्रकार केल्याच संशय व्यक्त केला. ज्येष्ठ नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.  या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन पथकं नेमली असून लवकरच त्यांना अटक केली जाईल, असा विश्वास निगडी पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या