Home /News /pune /

पुण्याचं 50 रुपयांचं प्लॅटफॉर्म तिकीट पाहिलं का? व्हायरल होताच रेल्वेने केला खुलासा

पुण्याचं 50 रुपयांचं प्लॅटफॉर्म तिकीट पाहिलं का? व्हायरल होताच रेल्वेने केला खुलासा

'काँग्रेसच्या काळात 3 रुपयांचं प्लॅटफॉर्म तिकीट आता 50 रुपयांपर्यंत पोहोचलं आहे.'

    मुंबई, 18 ऑगस्ट : आधीच राज्याचा कोरोनाचा कहर वाढत आहेत. त्यात आता कुठे लॉकडाऊन कमी झाल्याने लोकांचं जनजीवन रुळावर आलं आहे. त्यातचं रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपये केल्याचे जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर एकचं गोंधळ सुरू आहे. सोशल मीडियावर पुण्यातील प्लॅटफॉर्म तिकिटाचा फोटो व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर आणि जनतेने राग व्यक्त केल्यानंतर आता रेल्वेने याबाबत खुलासा केला आहे. रेल्वेने यावर सांगितले की, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटाची रक्कम 50 रुपयांपर्यंत केली आहे. मार्चमध्ये घेतलेल्या या निर्णयाचा हेतू प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी करणे हा आहे. कोरोनाचं संकट संपल्यानंतर या निर्णयावर पुन्हा विचार केला जाईल. खरंतर सोशल मीडियावर एक पोस्ट खूप व्हायरल होत आहे. यामध्ये पुणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत 50 रुपये लिहिली आहे. सोशल मीडियावर या पोस्टवर लोक प्रतिक्रिया देत आहेत. ज्यामध्ये म्हटले जात आहे की, काँग्रेसच्या काळात 3 रुपयांचं प्लॅटफॉर्म तिकीट आता 50 रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. यावर रेल्वे बोर्डाच्या चेअरमॅननी खुलासा केला आहे. जेव्हा रेल्वेने मार्चमध्ये  प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत वाढवली होती तेव्हा तब्बल 12000 प्रवाशी ट्रेन सुरू होत्या. त्यानंतर कोरोनामुळे लॉकडाऊन लागू केल्याने सर्व बंद करण्यात आले. मात्र सध्या केवळ 230 रेल्वे ट्रेन सुरू आहेत. आणि रेल्वे या ट्रेनमध्ये केवळ 50 टक्क्यांजवळ जागा भरू शकत आहे. सोबतच लोक कोणत्याही स्टेशनवर वेटिंग लिस्टच्या प्रवाशांना प्रवेश दिला जात नाही. म्हणजेच गतकाळाच्या तुलनेत स्टेशनवर केवळ 1 टक्के प्रवाशी पोहोचू शकत आहेत. येथे गर्दी दिसत नाही. अशातच प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत 50 रुपये झाल्याने लोकांच्या खिशाला मोठा फटका सहन करावा लागत आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या