पुणे शहरसह राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस, वेधशाळेने दिला 'हा' इशारा

पुणे शहरसह राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस, वेधशाळेने दिला 'हा' इशारा

पुणे शहर आणि परिसरात येत्या दोन दिवसांत अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज पुणे वेळशाळेनं वर्तवला आहे. आजही पुण्यातील काही भागात काहीसं ढगाळ वातावरण आहे.

  • Share this:

पुणे, 24 मार्च: पुणे शहरासह राज्यातील काही भागात  अवकाळी पाऊस कोसळत आहे. नगर जिल्ह्यातही पाऊस सुरु झाला आहे. तसेच येत्या दोन दिवसांत अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज पुणे वेळशाळेनं वर्तवला आहे. आजही पुण्यातील काही भागात काहीसं ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे उद्यापासून दोन दिवस पुणे परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडतील, अशी माहिती पुणे वेधशाळेचे हवामानतज्ज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली आहे.

हेही वाचा...कोरोनाचं थैमान, राज्यातील स्थिती सुधारण्यासाठी फडणवीसांनी सुचवले 4 नवे पर्याय

वातावरण बदलामुळे राज्यात अनेक ठिकाणी पुढील पाच दिवस पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ मुंबई आणि पुण्यातही ही पावसाचा अंदाज आहे. अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आलीय. त्याच बरोबर अनेक भागात वादळीवारा आणि विजेच्या कडकडाटसह पावसाचा अंदाज आहे. कोकणात सहा दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. मुंबईत काही ठिकाणी 27 आणि 28 तारखेला हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात चार-पाच दिवस काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल. तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल‌‌.

सोमवारी आणि मंगळवारी काही ठिकाणी गारपीटही होण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवस काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल. काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल‌. तर दोन दिवस गारपीटीची शक्यता आहे. विदर्भात 25 ते 28 तारखेपर्यंत हलक्‍या पावसाचा अंदाज आहे. तर काही तर काही ठिकाणी गारपिटीचाही अंदाज आहे.

हेही वाचा.. कर्फ्यू लागल्यानंतर विश्वास नांगरे पाटील आक्रमक, नियम तोडणाऱ्यांना दिला इशारा

पुणे आणि पुणे जिल्ह्यात मंगळवार रात्रीपासून ढगाळ वातावरण तयार राहील. तीस तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहील. मंगळवारपासून काही ठिकाणी शहरात आणि जिल्ह्यात तुरळक पाऊस पडेल. तर तुरळक ठिकाणी गारपिटीचा हि इशारा देण्यात आला आहे. विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल. त्याच बरोबर वादळ वारा ही निर्माण होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज असल्याची माहिती डॉ. अनूप कश्यपी यांनी दिलीआहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील इतर भागांत गारपीटसह वादळी पाऊस झाला होता. परंतु आता पुन्हा राज्यावर ढगाळ हवामानासह वादळी पावसाचं सावट पसरलं आहे. नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड आणि नंदुरबार जिल्ह्यांसह पुणे विभागातील काही भागांत मंगळवारी (24 मार्च) दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे तर 25 मार्चला जळगाव, नंदुरबार, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, नागपूर, वर्धा, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील काही भागांत; तर नगर, बीड, सोलापूर, सांगली, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील बहुतांश भागात वादळी पावसाचा अंदाज आहे. याचबरोबर 26 तारखेला प्रामुख्याने पश्चिम विदर्भासह नाशिक जिल्हा, खान्देश आणि मराठवाड्यातील उत्तरेकडे असलेल्या जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज आहे.

27 तारखेला पावसाचे क्षेत्र कमी होईल; परंतु, 28 आणि 29 तारखेला विदर्भ, मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पुन्हा एकदा वादळी पावसाची शक्यता नाकारता येणार नाही. उल्लेख केलेल्या भागांमध्ये 25 ते 29 मार्च दरम्यान काही प्रमाणात गारपीट होण्याचा अंदाज आहे, आणि ढगाळ हवामानामुळे कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहील, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

First published: March 24, 2020, 5:47 PM IST
Tags:

ताज्या बातम्या