BREAKING : राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंवर भरदिवसा गोळीबार, थोडक्यात बचावले!

BREAKING : राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंवर भरदिवसा गोळीबार, थोडक्यात बचावले!

दुपारी 1 वाजेच्या सुमारास तानाजी पवार नावाच्या इसमाने त्यांच्यावर हल्ला केला.

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 12 मे :  पिंपरी चिंचवडमध्ये (pimpri chinchwad) राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे (NCP Mla aana Bansode) यांच्यावर गोळीबार (Firing) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांच्यावर 3 राऊंड फायर करण्यात आले आहे. सुदैवाने अण्णा बनसोडे थोडक्यात बचावले आहे.

पिंपरी चिंचवड रेल्वे स्टेशनजवळ राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांचं कार्यालय आहे. याच परिसरात दुपारी 1 वाजेच्या सुमारास तानाजी पवार नावाच्या इसमाने त्यांच्यावर हल्ला केला. तानाजी पवारने पिस्तुलीतून अण्णा बनसोडे यांच्यावर 3 राऊंड फायर केल्याची माहिती मिळत आहे. या गोळीबारातून अण्णा बनसोडे हे थोडक्यात बचावले. अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार का आणि कशासाठी करण्यात आला, याचे कारण अद्याप कळू शकले नाही.

करावं तसं भरावं! तरुणांनी आगीशी घेतला पंगा; अंगावर शहारे आणणारा VIDEO

पोलिसांनी धाव घेऊन तानाजी पवार याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एक पिस्तुल सुद्धा जप्त केले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अधिक तपास पिंपरी चिंचवड पोलीस करत आहे.

Published by: sachin Salve
First published: May 12, 2021, 3:40 PM IST
Tags: NCP

ताज्या बातम्या