मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुणे जिल्ह्यातली घटना! दुचाकीवरून आलेल्या मारेकऱ्यांनी भर चौकात तरुणाला घातल्या गोळ्या

पुणे जिल्ह्यातली घटना! दुचाकीवरून आलेल्या मारेकऱ्यांनी भर चौकात तरुणाला घातल्या गोळ्या

शिरूर तालुका या भरदिवसा झालेल्या हत्येनं हादरला आहे.  दुचाकीवरून आलेल्या काही मारेकऱ्यांनी भर चौकात एका तरुणावर गोळीबार (Gun Firing) केला आहे.

शिरूर तालुका या भरदिवसा झालेल्या हत्येनं हादरला आहे. दुचाकीवरून आलेल्या काही मारेकऱ्यांनी भर चौकात एका तरुणावर गोळीबार (Gun Firing) केला आहे.

शिरूर तालुका या भरदिवसा झालेल्या हत्येनं हादरला आहे. दुचाकीवरून आलेल्या काही मारेकऱ्यांनी भर चौकात एका तरुणावर गोळीबार (Gun Firing) केला आहे.

शिरूर, 18 जानेवारी: पुणे (Pune) जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी (Takali Haji gaon) हे गाव एका हत्येच्या (Murder) घटनेनं हादरलं आहे. दुचाकीवरून आलेल्या काही मारेकऱ्यांनी भर चौकात एका तरुणावर गोळीबार (Gun Firing) केला आहे. या हल्ल्यात 30 वर्षीय तरुण स्वप्निल छगन रणसिंग (Swapnil chhangan ransingh) याचा मृत्यू (Death) झाला आहे. तर त्याचा मित्र स्वप्निल सुभाष गावडे हाही किरकोळ जखमी (Injury) झाला आहे. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला असल्याचं प्रथमदर्शीनी दिसत आहे. ही घटना आज सकाळी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या हत्येमुळे टाकळी हाजी गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

सदर घटना शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील सर्कल कार्यालयासमोर घडली. मोटारसायकलवरून आलेल्या मारेकऱ्यांनी दोघा मित्रांवर गोळीबार केला. यात एका जणांचा मृत्यू झाला असून एक जण किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव स्वप्निल छगन रणसिंग असं आहे. तर त्याचा मित्र स्वप्नील सुभाष गावडे यालाही गोळी चाटून गेली आहे. त्यामुळे तोही या हल्ल्यात किरकोळ जखमी झाला आहे. या गोळीबाराच्या घटनेनंतर टाकळी हाजी गावात मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा दाखल झाला आहे.

हा गोळीबार नक्की कोणत्या कारणावरून झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. गोळीबारानंतर दोन्ही जखमी तरुणांना शिरूर येथील चोरे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. येथे उपचार सुरू असताना स्वप्निल रणसिंग याचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे घटनास्थळी दाखल झाले असून तपासाला वेग आला आहे. या परिसरात असलेल्या सर्व सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी सुरू आहे. तसेच हल्लाच्या वेळी आसपास असलेल्या सर्व प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेतली जात आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Murder