मराठी बातम्या /बातम्या /पुणे /आई-बाबांची भेट राहिलीच, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भीषण अपघातात जीएसटी उपायुक्तांचा दुर्दैवी मृत्यू

आई-बाबांची भेट राहिलीच, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भीषण अपघातात जीएसटी उपायुक्तांचा दुर्दैवी मृत्यू

कामशेत बोगद्याजवळ (kamshet tunnel) इनोव्हा कारचे टायर फुटल्यामुळे भीषण अपघात झाला आहे.

कामशेत बोगद्याजवळ (kamshet tunnel) इनोव्हा कारचे टायर फुटल्यामुळे भीषण अपघात झाला आहे.

कामशेत बोगद्याजवळ (kamshet tunnel) इनोव्हा कारचे टायर फुटल्यामुळे भीषण अपघात झाला आहे.

आनिस शेख, प्रतिनिधी

लोणावळा, 25 मे : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर (mumbai pune expressway) कामशेत बोगद्याजवळ (kamshet tunnel) इनोव्हा कारचे टायर फुटल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोघे जण गंभीर जखमी आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात जीएसटी डेप्युटी कमिशनर अभिजीत घवले (GST Deputy Commissioner Abhijeet Ghawale) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत शंकर गोडा यतनाल यांचाही समावेश आहे. अभिजीत घवले यांच्या आई-वडिलांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे. त्यामुळे कार्यक्रमासाठी अभिजित घवले आपल्या कुटुंबीयांसह लातूरला निघाले होते. साडू, बायको आणि चालक असे मिळून गावी चालले होते.

पावसाळ्यापूर्वी लहान मुलांना 'ही' लस देणं आवश्यक, Covid टास्क फोर्सचा सल्ला

आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुंबईहून पुण्याकडे जात असताना घवले यांच्या इनोव्हा कारच्या समोरील टायर फुटले. त्यानंतर भरधाव कार पुढे जाणाऱ्या ट्रकवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, इनोव्हा कारचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.

या अपघातात कार मधील दोघांचा मृत्यू झाला आहे तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.  मृतांमध्ये अभिजीत घवले आणि शंकर गोडा यतनाल यांचा समावेश आहे.

पत्नीची हत्या करुन रचला अपघाताचा बनाव, पतीसह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल

त्यांच्या सोबत असलेले अपघातात वाहन चालक तसंच अभिजीत घवले यांच्या पत्नी गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. दोघांनाही उपचारासाठी सोमाटणे येथील पावना हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहन बाजूला केले आहे. या भीषण अपघातामुळे घवले कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

First published:
top videos