Home /News /pune /

अजितदादांचा असाही मोठेपणा, अमित शहांची एका मिनिटात केली पुण्यात मुक्कामाची व्यवस्था!

अजितदादांचा असाही मोठेपणा, अमित शहांची एका मिनिटात केली पुण्यात मुक्कामाची व्यवस्था!

भाजप नेते राष्ट्रवादीवर टीकेची एकही संधी सोडत नाही. पण, राजकारणात कुणीच कुणाचा शत्रू कायम नसतो हे पुन्हा एकदा अजित पवार यांनी दाखवून दिले.

पुणे, 18 डिसेंबर : राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांचा मोठेपणा आज पुन्हा एकदा पाहण्यास मिळाला आहे.  केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा (amit shah) पुण्यात मुक्कामी आहे. पण, ऐनवेळी त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था न झाल्याचं समोर आलं. अजित पवारांच्या ही बाब लक्षात आली आणि त्यांनी तातडीने सर्किट हाऊसमधील (pune circuit house) आपला VVIP सूट अमित शहा यांच्यासाठी उपलब्ध करून दिला. भाजप नेते राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी सरकारवर टीकेची एकही संधी सोडत नाही. पण, राजकारणात कायम कुणीच कुणाचा शत्रू नसतो हे पुन्हा एकदा अजित पवार यांनी दाखवून दिले. त्याचं झालं असं की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. आज ते पुण्यात मुक्कामी आहे. पुण्यातील क्विन्स गार्डन येथील व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊस आहे. या गेस्ट हाऊसमध्ये अमित शहा यांची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रशासनाने चाचपणी केली. पण, कोणताही व्हीव्हीआयपी सूट उपलब्ध नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले.  या व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊसमध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासाठी सूट राखीव असतो. तसंच प्रीमिअम सूट हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासाठी असतो. अजितदादा शनिवारी आणि रविवारी पुण्यात मुक्कामी असल्यामुळे त्यांच्या नावावर सूट बूक होता. प्रशासनाने अमित शहा यांच्या सूट उपलब्ध नसल्याची माहिती अजित पवार यांच्या कानी घातली. अजित पवार यांनी क्षणाचा विलंब न करता अमित शहा यांच्यासाठी आपला व्हीव्हीआयपी सूट उपलब्ध करून दिला. अजित पवार यांनी तातडीने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रशासनानेही सुटकेचा श्वास सोडला. कारण, केंद्रीय मंत्र्यांसाठी पुण्यातील खासगी हॉटेलमध्ये व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. पण, सुरक्षेच्या मुद्दा उपस्थितीत झाल्यामुळे खासगी हॉटेल्समध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था ऐनवेळी करता आली नाही. पण अजित पवारांनी आपला सूट उपलब्ध करून दिल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या