मराठी बातम्या /बातम्या /पुणे /दगडं, टेबल फॅन हाती जे लागेल त्याने मारलं, नातवाने घेतला आजोबांचा जीव, पुण्यातील धक्कादायक घटना

दगडं, टेबल फॅन हाती जे लागेल त्याने मारलं, नातवाने घेतला आजोबांचा जीव, पुण्यातील धक्कादायक घटना

नात्याला काळिमा फासणारी घटना शिरुर तालुक्यातील केंदूर गावात घडली.

नात्याला काळिमा फासणारी घटना शिरुर तालुक्यातील केंदूर गावात घडली.

नात्याला काळिमा फासणारी घटना शिरुर तालुक्यातील केंदूर गावात घडली.

पुणे, 07 जुलै: संपत्ती आणि जमिनीच्या वादातून सख्खी नातीचं एकमेकांच्या जीवावर उठल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत, असाच एक प्रकार पुणे (Pune) जिल्ह्यात घडला आहे. यात नातवाने घरात घुसून आजोबांचा (Grandfather) निर्घृण खून केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

नात्याला काळिमा फासणारी घटना शिरुर तालुक्यातील केंदूर गावात घडली. शंकरराव कृष्णराव ताथवडे (वय 69) असं दुर्दैवी मृत आजोबांचे नाव असून आरोपी भरत उर्फ बबलू सुदाम चौधरी (वय 36,रा. केंदुर ता- शिरूर जि - पुणे )हा नातू आहे.

मंगळवारी 6 जुलै रात्री आरोपी भरत घरात घुसला आणि त्याने सुरवातीला हातातील दगडाने आजोबांना गंभीर जखमी केले.'शेताला काट्या लावता काय, मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही. आता तुला खल्लास करणार आहे' असे म्हणून शिवीगाळ दमदाटी करून घरात घुसून सख्या नातवाने आजोबाच्या डोक्यात आणि चेहर्‍यावर, मांडीवर, दगडाने, लाकडी चौरंग, टेबल फॅनने मारहाण करून गंभीर दुखापत करून ठार केले आहे. शिवीगाळ करत नंतर दिसेल ती वस्तूने आजोबांना मारहाण केली आणि ठार केले. या नंतर तो फरार झाला.

1,56,98,97,00,00,000.00रुपये!मोजता मोजता थकाल,Jeff Bezosयांनी कमवली इतकी संपत्ती

घरात झालेले गोंधळ ऐकून शेजारच्या व्यक्तींनी धाव घेतली असता आजोबा रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले, त्यांनी तातडीने आजोबांना खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती केले. मात्र, उपचारापूर्वीच शंकर ताथवडे यांना डॉक्टरांनी मयत घोषित करण्यात आले. ही घटना घडली तेव्हा निर्मला शंकर ताथवडे (वय -55 ) या भांडणे सोडवण्यास गेल्या होत्या. पण आरोपीने त्यांना देखील मारहाण  केली आणि दमदाटी करत शिवीगाळ केली.

पैसे दुप्पट करण्यासाठी गुंतवा पोस्टाच्या या योजनांमध्ये पैसे,वाचा या 8 स्कीमबाबत

या घटनेनंतर शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, या पूर्वीच आरोपी फरार झाला होता. पोलीस आरोपीचा शोध घेत असून सदर घटनेचा तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके करत आहे. या घटनेमुळे मात्र तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

First published:
top videos

    Tags: Crime, Crime news, Murder, Murder news, Pune, Pune news, Shocking news