• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • आजीचा मृत्यू झाल्याने संतप्त नातवाची रुग्णालयात तोडफोड; पुण्यातील घटनेचा LIVE VIDEO

आजीचा मृत्यू झाल्याने संतप्त नातवाची रुग्णालयात तोडफोड; पुण्यातील घटनेचा LIVE VIDEO

Pune hospital vandalized by angry relative: रुग्णाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांकडून रुग्णालयात तोडफोड करण्यात आली आहे.

 • Share this:
  गणेश दुडम, प्रतिनिधी पुणे, 30 सप्टेंबर : उपचार घेत असताना एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू (woman died during treatment) झाल्यानंतर संतप्त महिलेच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमधील डॉक्टरांना शिवीगाळ केली. कर्मचाऱ्यांना मारहाण करत हॉस्पिटलमध्ये तोडफोड (hospital vandalised) केली. ही घटना देहूच्या (Dehu Pune) युनिकेअर हॉस्पिटल मध्ये घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी तुषार सुरेश चव्हाण याच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी डॉ. सुहास जोशी यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी तुषार याची आजी बेशुद्ध पडल्याने बेशुद्ध अवस्थेत त्यांना युनिकेअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले होते. उपचार सुरू असताना तुषारच्या आजीचा मृत्यू झाला. याबाबत फिर्यादी डॉ. सुहास जोशी यांनी नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर तुषार याने हंबरडा फोडून हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला. मोठमोठ्याने आरडा ओरड करून हॉस्पिटलची शांतता भंग करून, ड्युटीवर उपस्थित डॉ. संदीप पवार आणि डॉ. आनंद दुगड यांना शिवीगाळ करून अंगावर धावून गेला. यावर न थांबता मयत आजीच्या नातवाने हॉस्पिटलच्या काचेचा दरवाज्यावर जोराची लाथ मारली. बीपी मोजण्याचे मशीन फेकून त्याचे नुकसान केले. हॉस्पिटलमध्ये गोंधळ करून गणपतीचे डेकोरेशन तोडून टाकले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना मारहाण करण्याचे प्रकार वाढलेत, त्यामुळे वैधकीय सेवा देणारे हात ही भीतीने थरथर कापत आहेत. एखादा अतिदक्षता विभागातील रुग्ण उपचारासाठी दवाखान्यात आला तर त्याच्यावर उपचार करायचे की नाही? हाच प्रश्न या डॉक्टर मंडळींना पडला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये प्राचार्यांच्या केबिनमध्ये विद्यार्थ्यानं डोकं आपटून घेतलं तर तिकडे पिंपरी-चिंचवड शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्यालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. महात्मा फुले विद्यालयात शिकणार्‍या एका विद्यार्थ्याने प्राचार्याच्या केबिनमध्ये दरवाजावर डोकं आपटून स्वतःचं डोकं फोडून घेतलंय. या धक्कादायक घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही आता समोर आले आहे. विद्यार्थी आणि प्राचार्य यांच्यात शैक्षणिक शुल्क भरण्यावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. शुभम बारोट असं डोकं फोडून घेणाऱ्या संबंधित विद्यार्थ्यांचं नाव असून आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून हे चित्रीकरण सध्या वेगानं व्हायरल होत आहे. कोरोना काळात या विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यामुळे आपण 50 टक्केच शैक्षणिक शुल्क भरणार, अशी हमी विद्यार्थी शुभम यानं दिली होती. त्याला प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांनी देखील मान्यता दिली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा प्राचार्यांनी दिलेला शब्द फिरवला आणि आपल्याला पूर्ण फी भरण्यासाठी तगादा लावला त्यामुळे रागाच्या भरात आपण हे कृत्य केल्याचे शुभमचे म्हणणे आहे.
  Published by:Sunil Desale
  First published: