'आपके राज्य में हम...' अन् राज्यपालांची अजितदादांना कोपरखळी, पाहा हा VIDEO

'आपके राज्य में हम...' अन् राज्यपालांची अजितदादांना कोपरखळी, पाहा हा VIDEO

राज्यपालांच्या या कोपरखळीमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

  • Share this:

पुणे, 15 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पुण्यात शासकीय ध्वजारोहण सोहळा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी  राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थितीत होते. अजित पवार जेव्हा राज्यपालांचं स्वागत करण्यास पोहोचले होते, तेव्हा राज्यपालांनी आपल्या शैलीत चांगलीच कोपरखळी अजितदादांना लगावली.

पुणे जिल्ह्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते झाले.  कौन्सिल हॉल इथं हा सोहळा पार पडला. राज्यपाल ध्वजारोहण सोहळ्यासाठी पोहोचले असता त्यांच्या स्वागतासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थिती होते.

अजितदादांना पाहताच राज्यपाल म्हणाले की,'आपके राज्य में हम आपकी बिना परमिशन के आ गए है'. राज्यपाल असं म्हटल्यामुळे अजितदादांनीही स्मित हास्त करत 'असे काही नाही' म्हणून राज्यपालांचं स्वागत केलं.  राज्यपालांच्या या कोपरखळीमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

पुण्यात झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, खासदार गिरीश बापट, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या सह स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, कोरोना योद्धे उपस्थित होते.

Published by: sachin Salve
First published: August 15, 2020, 11:14 AM IST
Tags:

ताज्या बातम्या