मराठी बातम्या /बातम्या /पुणे /दहावीला 95 टक्के पडूनही बारावीचा ताण नाही झाला सहन; तरुणीनं इमारतीवरून उडी घेत दिला जीव

दहावीला 95 टक्के पडूनही बारावीचा ताण नाही झाला सहन; तरुणीनं इमारतीवरून उडी घेत दिला जीव

दोन दिवसांपूर्वी पुण्यातील (Pune) नांदेड सिटीमध्ये (Nanded City Suicide case) बारावीत शिकणाऱ्या नॅशनल हॉर्स रायडरनं इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचं वृत्त समोर आलं होतं.

दोन दिवसांपूर्वी पुण्यातील (Pune) नांदेड सिटीमध्ये (Nanded City Suicide case) बारावीत शिकणाऱ्या नॅशनल हॉर्स रायडरनं इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचं वृत्त समोर आलं होतं.

दोन दिवसांपूर्वी पुण्यातील (Pune) नांदेड सिटीमध्ये (Nanded City Suicide case) बारावीत शिकणाऱ्या नॅशनल हॉर्स रायडरनं इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचं वृत्त समोर आलं होतं.

पुणे, 03 ऑगस्ट: दोन दिवसांपूर्वी पुण्यातील (Pune) नांदेड सिटीमध्ये (Nanded City Suicide case) बारावीत शिकणाऱ्या नॅशनल हॉर्स रायडरनं इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचं वृत्त समोर आलं होतं. पालकांशी विचारपूस केल्यानंतर आता या संबंधित मुलीच्या आत्महत्येचं कारण समोर आलं आहे. बारावीच्या अभ्यासक्रमाचा ताण सहन न झाल्यानं तिने हे टोकाचं पाऊल उचललं असावं अशी माहिती कुटुंबीयांकडून मिळाली आहे. या घटनेचा  पुढील तपास पोलीस करत आहेत.

श्रीया गुणेश पुरंदरे असं आत्महत्या करणाऱ्या 17 वर्षीय तरुणीचं नाव होतं. तिने रविवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास नांदेड सिटी परिसरातील एका इमारातीच्या अकराव्या मजल्यावरून उडी घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, मृत श्रीयाच्या वडिलांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. त्यानुसार, श्रीयाला बारावीचा अभ्यासक्रम अवघड जात होता. याबाबत तिने दोन -तीन वेळा याबाबत आपल्या आई वडिलांना देखील सांगितलं होतं.

हेही वाचा-पुणे हादरलं! पैसे परत घ्यायला गेला अन् परतलाच नाही; स्मशानभूमीतच तरुणाचा शेवट

पण आई वडिलांनी तिची समजूत काढली होती. तसेच अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी तिला बाहेर फिरण्यासाठीही घेऊन गेले होते. पण नुकत्याच झालेल्या चाचणी परीक्षेत श्रीयाला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले होते. त्यामुळे ती निराश झाली होती. यातूनच तिने हे टोकाचं पाऊल उचललं असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे श्रीयाला दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळालं होतं. तिला दहावीत 95 टक्के मिळाले होते. असं असूनही तिला बारावीच्या अभ्यासाचा तणाव सहन झाला नाही. यातूनच तिने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

हेही वाचा-एका हातानं गळा अन् दुसऱ्या हातानं दाबलं तोंड; 2वर्षाच्या मुलीचा आईनंच घेतला जीव

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीया ही अत्यंत गुणी मुलगी होती. तसेच तिच्या घरातील वातावरणही खेळीमेळीचे होते. श्रीयाच्या वडीलांची हॉर्स रायडींगची ॲकॅडमी आहे. त्यामध्ये बालपणीपासून श्रीया हॉर्स रायडींगचे धडे घेत होती. राज्य व राष्ट्रीय पातळीवर श्रीयाने हॉर्स रायडींगमध्ये अनेक पारितोषिके पटकावली आहेत. सर्व काही ठीक असताना श्रीयाने इतके टोकाचं पाऊल का उचललं याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Pune, Suicide