Home /News /pune /

'गोपीनाथ मुंडेंच्या वारसदारांना संधी मिळाली पण... ' धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर निशाणा

'गोपीनाथ मुंडेंच्या वारसदारांना संधी मिळाली पण... ' धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर निशाणा

'गोपीनाथ मुंडेंच्या वारसदारांना संधी मिळाली पण... ' धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर निशाणा

'गोपीनाथ मुंडेंच्या वारसदारांना संधी मिळाली पण... ' धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर निशाणा

लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचे उद्घाटन आज पार पडले.

पुणे, 3 एप्रिल : लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचे उद्घाटन आज पार पडले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे ऑनलाईन या कार्यक्रमात सहभागी झाले होते. ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासोबत संत भगवान बाबा वसतिगृह योजनेच्या माध्यमातून 20 वसतिगृहे भाड्याच्या जागेत सुरू करण्यात येणार आहे. ऊसतोड कामगारांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी त्यांना ओळखपत्र देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. याच कार्यक्रमात भाषण करताना धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. धनंजय मुंडे म्हणाले, माझ्या आयुष्यात हा क्षण, आजचा हा दिवस स्वर्ण अक्षराने लिहावा असा आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार मंडळाची स्थापना नाही तर त्याच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटने दादांच्या शुभहस्ते झालं. महाविकास आघाडीचं सरकार आलं, या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करण्याची जबाबदारी दादांनी माझ्यावर दिली. या विभागाची जबाबदारी घेत असताना मी दादांना विनंती केली की, ऊसतोड कामगार मंडळ म्हटलं तर ते कामगार मंडळाकडे जाईल. मला ऊसतोड मजुरांसाठी काहीतरी करायचंय, कारण माझा जन्म ऊसतोड मजुराच्या पोटी झालाय. आजचा हा माझ्या जीवनातील दिवस... दादा (अजित पवार) हे तुमच्या शिवाज हे शक्यच नव्हतं हे मी प्रामाणिकपणाने सांगतो. धनंजय मुंडे पुढे म्हणाले, नेता आपला असा असावा... अभिमान वाटतो सांगायला की, पहिल्या अर्थसंकल्पात ऊसतोड मजुरांच्या महामंडळाची घोषणा तर केलीच. त्यासोबतच महामंडळाला भविष्यात पुढे कसलीच आर्थिक अडचण येऊ नये म्हणून या महाराष्ट्रात गाळप केला जाणारा प्रत्येक टनामागे 10 रुपये ऊसतोड मजुरांच्या कल्याणासाठी जर कोणी ठेवले असलतील तर ते फक्त अजित पवारांनी. सभागृहात निर्णय केला इतक्यावरच थांबले नाही तर टनामागे 10 रुपये कारखाने देतील आणि त्या 10 रुपयांना 10 रुपये राज्य सरकार देईल. इथून पुढच्या काळात आर्थिक अडचण कधीच येणार नाही. त्यामुळे ही पिढी आणि पुढची पिढी महामंडळाला कधीच विसरू शकत नाही. वाचा : "तुमच्या विधानाला 100% पाठिंबा,आता अमित ठाकरेंना.." सुजात आंबेडकरांचं राज ठाकरेंना ओपन चॅलेंज गोपीनाथ मुंडे यांनाही वाटत होतं की, एखादं महामंडळ असावं पण त्यांच्या रजकीय कारकिर्दीत ते झालं नाही. त्यांच्या राजकीय वारसदारांना संधी मिळाली पण त्यांनाही जमलं नाही. कदाचित नियतीला मुंडे साहेबांचं हे स्वप्न राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माझ्यावर द्यावी तरच हे होऊ शकतं... आज खऱ्या अर्थाने मुंडे साहेबांना महामंडळाच्या माध्यमातून आदरांजलीच आहे असंही धनंजय मुंडे म्हणाले.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Dhananjay munde, Pankaja munde

पुढील बातम्या