'त्यांना तिथेच ठोकले पाहिजे', पुण्यातील गुंडांच्या प्रतापामुळे पोलीस आयुक्त संतापले

'त्यांना तिथेच ठोकले पाहिजे', पुण्यातील गुंडांच्या प्रतापामुळे पोलीस आयुक्त संतापले

अशा गुन्हेगारांना कायदेशीर मार्गाने धडा शिकवला पाहिजे. त्यांना वाटलं पाहिजे आता आमचे काही खरं नाही.

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 20 ऑक्टोबर : एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालाजीनगर येथील काही सराईत गुंडानी तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार समोर आला आहे. याचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

या फोटोमुळे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश चांगलेच संतापले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी भोसरी ठाण्याच्या हद्दीतील बालाजीनगर येथे काही सराईत गुंडानी तलवारीने केक कापून गोंधळ घातला. याचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. तसेच, याव्यतिरिक्त शहरातील काही ठिकाणी टोळके राडा करीत असल्याच्या तक्रारी देखील पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे आल्या होत्या. याची गंभीर दखल घेत त्यांनी सोमवारी सकाळी थेट चॅनेलवरच झाडाझडती घेतली. कृष्ण प्रकाश यांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

नेमके काय म्हणाले आयुक्त?

''तलवारीने केक कापताना जेवढे सामील होते त्या सर्वांवर कारवाई करा. त्यांनी परवानगी घेतली होती का, ते रस्त्यावर आलेच कसे, वाढदिवस साजरा करण्यासाठी चौक किंवा रस्ता असतो का, त्यांच्यावर योग्य कलम न लावता जुजबी कलमा अंतर्गत कारवाई झाली आहे. हे फार चुकीचे आहे हे संबंधितांनी नीट लक्षात घ्यावे. आशा विकृतींना समाजात नाही गजाआड ठेवल पाहिजे. आगामी काळात अशा प्रकारची एकही चूक होता काम नये.

अशा गुन्हेगारांना कायदेशीर मार्गाने धडा शिकवला पाहिजे. त्यांना वाटलं पाहिजे आता आमचे काही खरं नाही. ज्या चौकात ते दहशत पसरवतात त्यांना तेथेच ठोकले पाहिजे. ते कसे काय गर्दी करून दहशत पसरवू शकतात. त्या चौकात त्यांचे राज्य आहे का, पण हे लक्षात ठेवा चौक सर्वसामान्य नागरिकांचा आहे. कुणाच्या बापाचा नाही. तसेच, काहीजण दुचाकीचा आवाज काढत फिरतात. फॅन्सी नंबरप्लेट लावून रॅश ड्राईव्ह करतात. त्यांच्यावरही कारवाईची मोहीम राबवा. जर पुन्हा माझ्याकडे तक्रारी आल्या तर संबंधित वरिष्ठ निरीक्षकाची त्यांच्या हद्दीवर पकड नाही, असे समजून मेमो दिला जाईल. त्यानंतर मी काय कारवाई करता ते तुम्ही बघालच"

दरम्यान, या प्रकरणी स्वप्नील पोटभरे,महेंद्र सरवदे,सलीम शेख,अभिषेक देवकर यांच्यासह इतर तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर MIDC भोसरी पोलीस या प्रकरणारचा पुढील तपास करत आहेत. नागरिकांमध्ये दहशत पसरविण्याचे असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी काळजी दक्ष राहण्याचे आवाहन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केलं आहे.

Published by: sachin Salve
First published: October 20, 2020, 2:19 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading