कोरोनाच्या दहशतीनंतर पुणेकरांसाठी चांगली बातमी, तुळशीबाग मार्केट होणार खुलं

कोरोनाच्या दहशतीनंतर पुणेकरांसाठी चांगली बातमी, तुळशीबाग मार्केट होणार खुलं

पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग मार्केट एक जूनपासून पुन्हा सुरु होणार आहे.

  • Share this:

पुणे, 29 मे : पुणे शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं होतं. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कधी नव्हे ती अनेक प्रसिद्ध ठिकाणं बंद झाली होती. मात्र आता चार टप्प्यातील लॉकडाऊननंतर कन्टेमेंट झोनमध्ये नसलेल्या भागात सूट देण्यात आली आहे. पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग मार्केट एक जूनपासून पुन्हा सुरु होणार आहे.

पुणे महापालिका प्रशासनाच्या परवानगीनंतर तुळशीबाग पूर्ववत सुरु होत आहे. महिला आणि तरुणाईची खरेदीसाठी झुंबड उडणारी तुळशीबाग ‘कोरोना’ टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर जवळपास अडीच महिने बंद होती. तुळशीबाग ही प्रतिबंधित क्षेत्रात येत नाही. त्यामुळे तुळशीबाग परिसर व्यापारी संघटनेने यासंदर्भात पालिका प्रशासनाला निवेदन दिलं होतं.

सुरक्षेसंदर्भात उपाययोजना राबवून मार्केट सुरू करण्याची हमी संघटनेने दिली होती. तुळशीबागेतील दुकानदार व कामगारांनी दुकानांची साफसफाई सुरू केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 16 ते 18 मार्च या कालावधीत तुळशीबागेतील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त बंद पाळला होता. त्यानंतर राज्यात संचारबंदी आणि केंद्राने लॉकडाऊन जारी केला. त्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून तुळशीबाग बंद होती.

पुण्यात डॉक्टरांची भरती होणार

महापालिकेतील रखडलेल्या डॉक्टर भरतीला वेग आला असून कायम स्वरूपी भरण्यात येणाऱ्या पदांची ‘मेरिट लिस्ट’ जाहीर झाल्यानंतर कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणाऱ्या पदांच्या भरतीलाही वेग येणार आहे. महापालिकेत एकूण 1283 पदे भरणार आहे. त्यात 1105 तात्पुरती पदे आहेत. तर 178 ही कायम स्वरुपाची पदे आहेत. निवडलेल्या उमेदवारांची मेरिट लिस्ट शुक्रवारी (29 मे) रोजी लागणार आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 29, 2020, 6:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading