पुणे 23 जून: कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच पुण्याला (Pune) मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना रुग्णांचं (Covid-19) बरे होण्याचं प्रमाण वाढलं असून टक्केवारी 59.76 टक्क्यांवर गेली आहे. पुणे जिल्ह्यातल्या बाधितांची संख्या 16 हजार 385 वर गेली आहे. तर 9791 रुग्ण बरे झाले आहेत. तर 608 रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला. सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांपैकी 355 जणांची प्रकृती गंभीर आहे.
दरम्यान, देशातील कोरोनाबाधितांचा आकडा सलग दुसऱ्या दिवशी 15 हजारांच्या आसपास गेला आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 14 हजार 933 नवीन रुग्ण आढळून आले. तर, 312 जणांचा मृत्यू झाला. यासह भारतातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 4 लाख 40 हजार 215 झाला आहे.
देशात सध्या 1 लाख 78 हजार 014 सक्रीय रुग्ण आहेत. तर, 2 लाख 48 हजार 190 रुग्ण निरोगी झाले आहे. आतापर्यंत देशात 14 हजार 011 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह भारताचा रिकव्हरी रेट वाढून आता 56.37% झाला आहे.
आकडे कमी दाखवण्याच्या नादात चाचण्यांकडे दुर्लक्ष' फडणवीसांचा हल्लाबोल
देशातल सर्वात जास्त सक्रीय रुग्ण महाराष्ट्रात आहे. राज्यात 61 हजारहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यानंतर दिल्ली, तामिळनाडू, गुजरात आणि पश्चिम बंगाल याचा क्रमांक लागतो.
मुंबईसह उपनगरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. कोरोना नियंत्रणात आणताना प्रशासनाच्या नाकी नऊ आले असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, मालाडमधील तब्बल 70 पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बेपत्ता आहेत. त्यामुळे या रुग्णांना शोधण्याचं एक मोठं आव्हान महापालिकेसमोर उभं ठाकलं आहे. याबाबत महापालिकेने पोलिसांना एक पत्र पाठवून मदत मागितली आहे.
धक्कादायक! मुंबईतील मालाडमधून 70 पेक्षा जास्त कोरोना पॉझिटव्ह रुग्ण बेपत्ता
कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या पी वार्डमधील हे सगळे रुग्ण आहेत. या रुग्णांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन राबविण्यात येत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त प्रणय अशोक यांनी दिली आहे.
संपादन - अजय कौटिकवार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus