• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • पुणेकरांसाठी Good News! सलग सहाव्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक

पुणेकरांसाठी Good News! सलग सहाव्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक

राज्य सरकारने ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहिम राबवल्याने कोविड रुग्ण शोधण्यास मदत झाली आणि जनजागृतीही झाली.

राज्य सरकारने ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहिम राबवल्याने कोविड रुग्ण शोधण्यास मदत झाली आणि जनजागृतीही झाली.

Good News for Punekars: पुण्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत होणारी वाढ आता कमी होत असल्याचं दिसत आहे.

  • Share this:
पुणे, 24 एप्रिल: गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील (Pune) कोरोना (Corona) बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत होती. कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णांना बेड्स मिळत नव्हते. मात्र, आता पुणेकरांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कारण, एप्रिल महिन्यात प्रथमच कोरोना बाधितांच्या सख्येत घट (Covid positive patients number reduce) झाली आहे. दैनंदिन रुग्णवाढीचा आकडा हा 4 हजारांच्या खाली आला आहे जो गेल्या पंधरवड्यात तब्बल 7 हजारांवर पोहोचला होता. रुग्णांची संख्या 4 हजारांखाली पुण्यात आज दिवसभरात 3991 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 4789 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. याच दरम्यान आज 74 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे त्यापैकी 19 रुग्ण हे पुण्याच्या बाहेरील आहेत. पुण्यातील सक्रिय रुग्ण संख्या 50 हजारांखाली सध्या पुण्यात 49,472 सक्रिय रुग्ण आहेत त्यापैकी 1364 रुग्णांची स्थिती गंभीर आहे. पुण्यात आतापर्यंत 6443 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत पुण्यातील एकूण 3,39,571 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. Explainer : जाणून घ्या लस घेतल्यावर सुद्धा का होतोय Corona महापौरांनी केलं ट्विट पुण्यातील वाढत्या रुग्णसंख्येला ब्रेक लागला असल्याने पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करुन पुणेकरांचे आभार मानले आहेत. मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत म्हटलं, "धन्यवाद पुणेकर, सलग सहाव्या दिवशी नवी रुग्णसंख्या कोरोनामुक्त संख्येपेक्षा कमी. पुणे शहरात कोोना निर्मूलन उपाययोजनांना मोठे यश मिळत असून सलग सहाव्या दिवशी नव्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे." राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आणि कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांचे पुणेकरांनी पालन केल्यामुळेच आता वाढत्या रुग्णसंख्येला आळा बसला असून कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
Published by:Sunil Desale
First published: