S M L

चक्क सोन्याचा ब्रश ! एका सुरक्षारक्षक चित्रकाराची कहाणी

हणमंत शिंदे हे एका खासगी कंपनीत केवळ दहा हजार रुपये पगारावर सुरक्षारक्षकाची नोकरी करतात

Updated On: Oct 20, 2018 05:41 PM IST

चक्क सोन्याचा ब्रश ! एका सुरक्षारक्षक चित्रकाराची कहाणी

गोविंद वाकडे, प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड, 20 आॅक्टोबर : कुठलीही कला सोन्या सारखीच असते. मात्र पिंपरी चिंचवडमधील एका अवलिया कलाकारांने सोन्याचे दागिने नाहीत तर चक्क सोन्याचा चित्रकलेचा ब्रश तयार केलाय.हणमंत शिंदे...दहा बाय दहाच्या छोट्याश्या खोलीत आपल इंद्रधनुषी विश्व निर्माण करणारा हा चित्रकार...केवळ आपल्या कलेची जोपासनाच नाही तर, या सोनेरी ब्रशने चित्र रेखाटुन तो आपल्या कलेची उपासनाही करतो आणि त्यामुळे हणमंतने रेखाटलेल्या चित्रांकडे बघतंच राहावं वाटतंय.

हणमंत शिंदे हे एका खासगी कंपनीत केवळ दहा हजार रुपये पगारावर सुरक्षारक्षकाची नोकरी करतात. पण उत्तम चित्रकार असूनही आपल्या कलेप्रमाणे अडगळीत पड़लाय.

Loading...
Loading...

मात्र अश्याही परिस्थितीत त्याला आपल्यातील कला वाढवायची आहे, तिला प्रतिष्ठा मिळवून द्यायची आहे. ज्याच्या मोठा अभिमान हणमंतच्या पत्नीला वाटतो.

शालेय जीवनात अनेकजन चित्रकलेकड़े पाठ फिरवतात. मात्र आपला प्राचीन आणि समृद्ध इतिहास सागणाऱ्या या चित्रकलेचा वारसा जपणारी पिढ़ी निर्माण व्हावी, यासाठी हणमंत प्रयत्न करत आहे.

============================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 20, 2018 05:36 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close