पुणे, 15 नोव्हेंबर : लक्ष्मीपूजन हा दीपावलीचा महत्वाचा दिवस. मात्र याच दिवशी "मुलीच्या बदल्यात मुलगी" असं म्हणत पुण्यातील (Pune) दाम्पत्याने खेड तालुक्यातील आंभु गावातून एका मुलीचे अपहरण (kidnapping) केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. राजगुरुनगर पोलिसांत याबाबत मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल झाल्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील एक मुलगी खेड तालुक्यातील आंभु गावातील मुलाबरोबर लग्नाच्या हेतूने पळून गेली होती. त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास मुलाकडील गावात म्हणजे खेड तालुक्यातील आंभु गावात येऊन मुलीचे अपहरण केले.
अडीज लाख नागरिकांच्या मृत्यूनंतर US मध्ये कोरोनाचा कहर अधिक वाढला
यावेळी अपहरण केलेल्या मुलीच्या पालकांना दमबाजी करत सांगितले की, 'आमची मुलगी तुमच्या मुलाबरोबर पळून गेली आहे, तीला आमच्याकडे सुखरुप पाठवा मगच तुमची मुलगी तुम्हाला परत देऊ' असे म्हणत जबरदस्तीने मुलीचे आंभु गावातून अपहरण केले. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. त्यानंतर अपहरण झालेल्या मुलीच्या कुटुंबाने राजगुरुनगर पोलिसांत तक्रार दाखल केली.
पतीने पत्नीच्या क्रेडिट कार्डने केला लाखोंचा खर्च; शेवटी पोलीस ठाण्यात रवानगी
'मुलीच्या बदल्यात मुलगी' असं म्हणत अपहरणाची घटना घडल्यानंतर राजगुरुनगर पोलिसांनी पथक तयार करुन पुण्याकडे पाठवले आहे. या घटनेत मुलीचे आंभु गावातून अपहरण करणारी एक महिला व तिचा नातेवाईक या दोघांना राजगुरुनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून पळवून नेलेली मुलगी सुखरूप असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी दिली.
अॅसिड टाकून पेटवून दिलेल्या तरुणीचा मृत्यू
दरम्यान, बीडमध्ये प्रेयसीवर अॅसिड टाकून आणि पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. जखमी अवस्थेत पीडित तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.
नांदेड जिल्ह्यातील देगलुर तालुक्यातील शेळगावातील येथील सावित्रा दिगंबर अंकुलवार ( वय 22) असं मृत तरुणीचं नाव आहे. ती शेळगावातीलच अविनाश राजुरे नावाच्या तरुणासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दिनांक 13 नोव्हेंबर रोजी रात्री दोघेही पुण्याहुन गावी परतण्यासाठी दुचाकीवरून जात होते.
दिवाळीनिमित्त ऋचा चढ्ढाने शेअर केलेला PHOTO पाहून स्मिता पाटील यांची आठवण
पहाटे 3 वाजेच्या सुमारास येळंब (घाट) परिसरात निर्मनुष्य ठिकाणी मांजरसुंबा -केज हा मुख्य रस्त्यावरून जात असताना आरोपी तरुणाने गाडी थांबवली. त्यानंतर या तरुणाने रस्त्याच्या बाजूला अगोदर तरुणीवर अॅसिड टाकले. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही, काही वेळाने त्याने पेट्रोल टाकून तरुणीला पेटवून दिले. तरुणीला पेटवून दिल्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेत सावित्रा 48 टक्के भाजली होती.