मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

Pune: प्रेयसीकडून फसवणूक अन् मामाकडून धमकी, प्रेमात खच्चीकरण झालेल्या तरुणाचा हृदयद्रावक शेवट

Pune: प्रेयसीकडून फसवणूक अन् मामाकडून धमकी, प्रेमात खच्चीकरण झालेल्या तरुणाचा हृदयद्रावक शेवट

Crime in Pune: प्रेमसंबंधाची माहिती प्रेयसीच्या मामाला मिळाल्यानंतर घाबरलेल्या तरुणानं आपल्या राहत्या घरी गळफास घेत आयुष्याचा शेवट केला आहे.

Crime in Pune: प्रेमसंबंधाची माहिती प्रेयसीच्या मामाला मिळाल्यानंतर घाबरलेल्या तरुणानं आपल्या राहत्या घरी गळफास घेत आयुष्याचा शेवट केला आहे.

Crime in Pune: प्रेमसंबंधाची माहिती प्रेयसीच्या मामाला मिळाल्यानंतर घाबरलेल्या तरुणानं आपल्या राहत्या घरी गळफास घेत आयुष्याचा शेवट केला आहे.

    पुणे, 05 डिसेंबर: पुण्यातील (Pune) कोथरूड परिसरात एका तरुणानं आत्महत्या (Young man commits suicide in love affair) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधाची माहिती प्रेयसीच्या मामाला मिळाल्याने घाबरलेल्या तरुणानं आपल्या राहत्या घरी गळफास घेत आयुष्याचा शेवट केला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणानं सुसाईड नोट (Suicide note) देखील लिहिली आहे. त्यानुसार कोथरूड पोलिसांनी प्रेयसीसह तिच्या मामाविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणलाही अटक केली नसून या घटनेचा तपास सुरू केला आहे. मृत प्रियकर तरूण हा पुण्यातील कोथरूड परिसरातील रहिवासी आहे. गेल्या काही काळापासून त्याचं कोथरूड परिसरातील रहिवासी असणाऱ्या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. प्रेमसंबंधात अडकल्यानंतर, सुरुवातीपासूनच दोघांच्या काही गोष्टी एकमेकांना खटकत होत्या. त्यामुळे त्यांचं कोणत्या ना कोणत्या कारणातून अनेकदा खटके उडत होते. त्यामुळे प्रेयसी फसवत असल्याची भावना तरुणाच्या मनात होती. हेही वाचा-हनिमूनच्या रात्रीच दिल्या नरक यातना; मित्रांसह पतीचं नवविवाहितेसोबत विकृत कृत्य असं असताना त्याच्या प्रेमसंबंधाची माहिती प्रेयसीच्या मामाला मिळाली. त्यामुळे संतापलेल्या मामाने तरुणाच्या घरी येऊन मृत तरुणाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. 'तू तिचा नाद सोड नाहीतर...' अशी धमकी मामाने संबंधित तरुणाला दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येची ही घटना उघडकीस येताच कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा  पंचनामा केला असता, तरुणाच्या खिशात पोलिसांना सुसाईड नोट मिळाली आहे. हेही वाचा-प्रेमाचा दुर्दैवी शेवट,12 वीमध्ये शिकणाऱ्या तरुण-तरुणीने घेतला एकाच झाडाला गळफास सुसाईड नोटमध्ये तरुणानं आत्महत्या करण्यामागचं कारण लिहिलं असून त्यामध्ये प्रेयसीसह तिच्या मामाचं नाव नमूद केलं आहे. सुसाईड नोटच्या आधारे कोथरूड पोलिसांनी प्रेयसीसह तिच्या मामाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास कोथरूड पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pune, Suicide

    पुढील बातम्या