Home /News /pune /

वाट बघता बघता गर्लफ्रेंड गेली रिक्षावाल्यासोबत पळून, आसिफने घेतला असा बदला की, पुणे पोलीसही झाले हैराण

वाट बघता बघता गर्लफ्रेंड गेली रिक्षावाल्यासोबत पळून, आसिफने घेतला असा बदला की, पुणे पोलीसही झाले हैराण

आसिफला प्रेयसीचा राग तर होताच पण रिक्षाचालकांची त्याला चीड आली. त्यामुळे त्याच रागाने चिडून जाऊन त्याने रिक्षाचालकांना टार्गेट केले.

पुणे, 25 ऑगस्ट : प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असं म्हणतात. पण, प्रेमात धोका दिल्यावर माणूस काय करेल याचा नेम नाही. असाच एक प्रेमभंग झालेल्या चोराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याने प्रेमाचा बदला म्हणून  फक्त रिक्षाचालकांना टार्गेट केले होते. पोलिसांना जेव्हा या चोराने असं का केलं सांगितलं, तेव्हा सर्वांनी डोक्याला हात लावला. घडलेली हकीकत अशी की, पुण्याच्या लष्कर पोलिसांनी एक प्रेमवीर चोरटा पकडला आहे. पोलिसांनी या चोरट्याकडून तब्बल 80 चोरीचे मोबाईल हस्तगत केले आहे. विशेष म्हणजे. हे सगळे 80 मोबाईल हे रिक्षाचालकांचे आहेत. हे मोबाईल का चोरले आणि ते सगळे रिक्षावाल्यांचेच का चोरले याच चोरट्याने पोलिसांना दिलेल उत्तर डोकं चक्रावून टाकणारं आहे. बाइकवरून जात असताना न्यूज चॅनलच्या पत्रकाराला घातल्या गोळ्या, भरचौकात केली हत्या लष्कर पोलिसांनी रविवारी आसिफ उर्फ बोहरा शेख या चोरट्याला अटक करून त्याच्याकडून तब्बल 80 चोरीचे मोबाईल फोन जप्त केले. आसिफने चोरलेले हे सगळे मोबाईल फोन हे रिक्षाचालकांचे आहेत. आसिफची प्रेयसी ही मूळची गुजरातची आहे. दोघांची लव्हस्टोरी चांगली सुरू होती. पण, अचानक त्याच्या प्रेयसीचे काही महिन्यांपूर्वी एका रिक्षाचालकासोबत प्रेमसंबंध जुळले. याची खबर आसिफला लागायच्या आता तिने रिक्षासोबत पळ काढला होता. आपली प्रेयसी एका रिक्षाचालकासोबत पळून गेली हे ऐकून आसिफला जबर धक्का बसला. 'सरकारच्या या चुकीमुळे चेतन चौहानांचा मृत्यू झाला', शिवसेननं केला आरोप आसिफला प्रेयसीचा राग तर होताच पण रिक्षाचालकांची त्याला चीड आली. त्यामुळे  त्याच रागाने चिडून जाऊन त्याने रिक्षाचालकांना टार्गेट केले. आतापर्यंत आसिफने 80 रिक्षाचालकांचे मोबाईल चोरले. चोरी करताना ही आसिफने इतर कुणाचेही फोन न चोरता केवळ रिक्षाचालकांनाच आपलं लक्ष्य केल होते. पण, प्रेमभंग झाल्यामुळे गुन्हेगारी मार्ग पत्कारणे आसिफला महागात पडले आहे. अखेर पोलिसांनी आसिफला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक चंद्रशेखर भोसले करत आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Love story

पुढील बातम्या