• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • प्रेम एकीवर आणि संसार दुसरीशी; विरह जिव्हारी लागल्यानं पुण्यातील प्रेयसीचं टोकाचं पाऊल

प्रेम एकीवर आणि संसार दुसरीशी; विरह जिव्हारी लागल्यानं पुण्यातील प्रेयसीचं टोकाचं पाऊल

प्रियकरानं दुसऱ्याच मुलीशी संसार थाटल्यानं पुण्यातील एका युवतीनं टोकाचं पाऊल उचललं आहे. (File Photo)

प्रियकरानं दुसऱ्याच मुलीशी संसार थाटल्यानं पुण्यातील एका युवतीनं टोकाचं पाऊल उचललं आहे. (File Photo)

Suicide in Pune: प्रियकरानं दुसऱ्याच मुलीशी संसार थाटल्यानं पुण्यातील एका युवतीनं टोकाचं पाऊल उचललं आहे.

 • Share this:
  पुणे, 22 ऑगस्ट: प्रियकरानं दुसऱ्याच मुलीशी संसार थाटल्यानं (Boyfriend marriage with another girl) पुण्यातील एका युवतीनं टोकाचं पाऊल उचललं (Girlfriend Commits suicide) आहे. प्रियकरानं प्रेमात धोका देऊन (Cheating in love affair) अन्य मुलीशी लग्न केल्यानं नैराश्यात गेलेल्या 22 वर्षीय तरुणीनं गळफास घेत आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकरासह त्याच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. मनिषा गोविंद गायकवाड असं आत्महत्या करणाऱ्या 22 वर्षीय तरुणीचं नाव असून ती फुरसुंगी परिसरातील रहिवासी आहेत. मागील काही दिवसांपासून तिचं हडपसर परिसरातील पानमळा येथे राहणाऱ्या नितीन दत्तात्रय गायकवाड (वय-23) याच्याशी प्रेमसंबंध सुरू होते. यांच्यातील प्रेमसंबंधाची माहिती नितीनच्या आई वडिलांनाही माहीत होती. असं असूनही त्यांनी आपल्या मुलाचा विवाह अन्य एका मुलीशी लावून दिला. हेही वाचा-5वर्षांनी भेटलं हरवलेलं प्रेम; पंजाबमधून गायब झालेली पत्नी अचानक येरवड्यात दिसली आपल्या प्रियकरानं परस्पर दुसऱ्या मुलीशी संसार थाटल्याचं कळताच मनिषा नैराश्याच्या गर्तेत गेली. यातूनच तिने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. याप्रकरणी मृत मनिषाचे वडील गोविंद यांनी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हेही वाचा-जिच्यावर जिवापाड प्रेम केलं तिलाच संपवलं; नवविवाहितेच्या हत्येनं पुणे हादरलं पोलिसांनी आरोपी प्रियकरासह त्याच्या आई-वडिलांवरही आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हडपसर पोलिसांनी सविस्तर जबाब नोंदवून घेतल्यानंतरचं प्रियकराच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल केल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेचा पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: