शाळेतून घरी जाणाऱ्या नववीच्या विद्यार्थिनीला भरधाव ट्रकनं चिरडलं, डोक्यावरून गेलं चाक

शाळेतून घरी जाणाऱ्या नववीच्या विद्यार्थिनीला भरधाव ट्रकनं चिरडलं, डोक्यावरून गेलं चाक

विद्या शाळा सुटल्यानंतर आपल्या स्कूटरने घरी निघाली होती. ती शिवाजी चौकात आली असता तिला समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने तिला जोरदार धडक दिली.

  • Share this:

सुमीत सोनवणे,(प्रतिनिधी)

दौंड,15 ऑक्टोबर: शाळेतून घरी जाणाऱ्या नववीच्या विद्यार्थिनीला भरधाव ट्रकने चिरडले. या अपघातात विद्यार्थिनीचा जागेवरच मृत्यू झाला आहे. शहरातील शिवाजी चौकात मंगळवारी सकाळी ही घटना घडली. अपघात होतचा ट्रक ड्रायव्हर गाडी सोडून फरार झाला.

विद्या चलवादी असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. विद्या शाळा सुटल्यानंतर आपल्या स्कूटरने घरी निघाली होती. ती शिवाजी चौकात आली असता तिला समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने तिला जोरदार धडक दिली. ती ट्रकच्या मागील चाकाखाली आली. विद्याच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेले. तिचा जागेवरच मृत्यू झाला.

या अपघातामुळे काही काळ शहरातील शिवाजी चौकात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांकडून काही काळ वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. जड वाहन शहरातून जात असल्याने अशाप्रकारच्या अपघाताला निमंत्रण दिले जात आहे. दौंडमधील रस्त्यांची कामे आणि अतिक्रमणामुळे हा अपघात झाला आहे. या घटनेने नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे.

नगर-दौंड मार्गावर ट्रकने दोघांना चिरडले

दरम्यान, श्रीगोंदे तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे नगर-दौंड रस्त्यावर भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोघांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला होता. सुनील तानाजी कसार(रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर) व मोहन बाबूराव सुलसाने (रा. गौतमनगर, श्रीरामपूर) अशी मृतांची नावे आहेत.

लोणी व्यंकनाथ येथील लक्ष्मी मंगल कार्यालयानजीक अचानक पाऊस सुरू झाल्याने सुनील आणि मोहन दुचाकी थांबवून रस्त्याच्या कडेला उभे होते. त्याच दरम्यान नगरहून दौंडच्या दिशेने भरधाव निघालेला ट्रक दुसऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात सरळ या दोघांच्या अंगावर आला. काही कळण्याच्या आत ट्रकने दोघांना चिरडले. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता.

मुख्यमंत्री फडणवीसांकडून नारायण राणेंचं तोंडभरून कौतुक, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 15, 2019 03:14 PM IST

ताज्या बातम्या